पवनी : पवनी वरून एस.टी. बसच्या सोबतच मोठ्या प्रमाणात लक्झरी बसेस, काळी पिवळी ट्रक्स व अन्य प्रवासी गाड्या नागपूर, भंडारा, लाखांदूर व ब्रम्हपूरी मार्गावर धावतात. एस.टी. च्या तुलनेत प्रवास भाडे कमी असल्याने नोकरवर्ग, व्यापारी तसेच अन्य प्रवासी खाजगी वाहनांचा वापर करतात. परंतु क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी काळी - पिवळी शिवाय इतर वाहनांवर प्रवासी वाहतूक करण्यास बंदी घालावी, अशी तोंडी सूचना पोलीस विभागास दिल्याने ती सूचना ‘फारवर्ड’ करण्याचे काम पोलीस विभागाने केले. यामुळे कित्येकांना बेरोजगार होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पवनी तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही त्यामुळे कित्येक बेरोजगार तरुणांनी जिपगाड्या घेतल्या दररोज लांबपल्ल्याची पार्टी मिळत नाही त्यामुळे रोडवर गाडी चालवून पोटापुरता कमावण्याचा उद्योग सुरु केला. प्रवासी गाड्या चालत असल्याने लोकांची सोय तर होतेच पण मालक, चालक, वाहक व गाड्यासाठी प्रवासी शोधणारे बेरोजगार ह्या सर्वांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. असे असताना रोजगाराची संधी उपलब्ध करून न देणारे शासन त्यांचे प्रतिनिधी लोकांना स्वबळावर रोजगार करू देत नसतील तर बेरोजगार यवुकांनी कोणाकडे हात पसरावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. राज्यात कुठेही बंदी नसतांना पवनी तालुक्यात अशी वाहन चालविणाऱ्यांवर बंदी का, असा प्रश्न वाहन चालकमालकांनी उपस्थित केलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)
बससह धावणार परवानाधारक काळीपिवळी
By admin | Updated: November 22, 2014 22:57 IST