शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:33 IST

पवनी - उमरेड, पवनी कºहांडला अभयारण्यासोबत काही प्रश्न निर्माण झाले आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेतो, अशा प्रकारे खापरी येथील पुनर्वसणाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले.

ठळक मुद्देपरिणय फुके : खापरी महोत्सव कृती समितीने केला नागरी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवनी - उमरेड, पवनी कऱ्हांडला अभयारण्यासोबत काही प्रश्न निर्माण झाले आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेतो, अशा प्रकारे खापरी येथील पुनर्वसणाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. यापुढेही शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत राहू असे प्रतिपादन आमदार परिणय फुके यांनी केले.खापरी महोत्सवात कृती समितीच्यावतीने प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावला म्हणून आमदार फुके यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी फुके यांनी, प्रकल्पग्रस्त खापरी अभयारण्यात येऊन ठेवल्याने समस्या गंभीर झाली.या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून भूसंपादन कायद्यानुसार सरळ खरेदी करण्याचे ठरले आहे. याबाबत ३ नोव्हबरेला पुनर्वसन अधिकारी विजय भाकरे यांनी भूसंपादन कायद्यानुसार जमिन व घरांची सरळ पद्धतीने खरेदी करून व ही प्रक्रिया तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण करू असा आदेश काढला.प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे रामभाऊ बांते व डॉ सुनील जीवनतारे यांच्या पुढाकाराने शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन आमदार फुके यांना गौरविण्यात आले.याप्रसंगी ग्रामपंचायत खापरीच्या सरपंच लक्ष्मीबाई ठवकर, नेरला ग्रामपंचायत सरपंच नितीन कोदाणे, उपसरपंच विठ्ठल नारनवरे, ग्रा. प. सदस्य पांडुरंग कबेट, रेश्मा रेहपाडे, ज्योती बागडे, शारदा रेहपाडे, पुंडलिक भोयर यांनी भाजपात प्रवेश केला.या कार्यक्रमाला भाजप जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, नागपूर मनपाचे नगरसेवक पिंटू झलके, अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी, हरीष तलमले, तिलक वैद्य, राजेंद्र फुलबांदे, अमोल तलवारे, दत्तू मुनतीवार, मुख्याध्यापक अशोक पारधी, मयुर रेवतकर, लोकेश गभणे, मनोज शेंडे, गुलाब शिंधिया, महादेव शिवरकर, मनोहर मेश्राम, प्रकाश रेहपाडे बबलु वाघमारे, अतुल भुरे, संकुल सहारे, प्रतीक हटवार, सचिन सहारे, पुरुषोत्तम वाडीभस्मे, मुकळन वाडीभस्मे, रामरतन वैद्य, जयपाल गजभिये उपस्थित होते.संचालन संजय भोवते यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. सुनील जिवनतारे यांनी केले. आभार प्रदर्शन एस. डी. चेटूले यांनी मानले. सत्कार समारंभासाठी खापरी, परसोडी, गायडोंगरी, निमगाव व चिचखेडा गावातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.