कंत्राटदारांची देयके रखडली : भंडारा लघु पाटबंधारे विभागातील प्रकार, आठ दिवसांपासून अंधारात भंडारा : लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा या कार्यालयाची विद्युत जोडणी मागील आठवड्यात कापण्यात आली. आज आठ दिवसांचा कालावधी लोटला असतानाही विद्युत जोडणी पुर्ववत करण्यात आली नाही. यामुळे या कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांचे लाखोंचे देयके रखडल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांच्या अधिनस्थ असलेल्या भंडारा लघु पाटबंधारे उपविभागाचे कार्यालय जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्याशेजारी आहे. या कार्यालयात स्वत:चे विद्युत मिटर नाही. मागील अनेक वर्षांपासून या कार्यालयाला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मात्र विद्युत पुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत नव्हता. त्यामुळे येथील उपविभागीय अभियंता यांनी शासकीय कामांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी लगतच्या डिआरडीए विभागाकडून काही दिवसांपूर्वी वीज जोडणी घेतली होती. सुमारे महिनाभरापूर्वी डीआरडीएने या कार्यालयाला विद्युत जोडणी करून तात्पुरता वीज पुरवठा सुरु केला होता. मात्र या विभागानेही १३ जुलैला कुठलीही पूर्व सूचना न देता या उपविभागीय कार्यालयाला करण्यात आलेला विद्युत पुरवठा अचानकपणे खंडीत केला. यामुळे मागील आठवडाभरापासून या कार्यालयात वीज जोडणीअभावी महत्वाची शासकीय कामे रखडली आहेत.कार्यालयाला सुरु असलेला विद्युत पुरवठा अचानकपणे बंद करण्यात आला. तर दुसरीकडे शुक्रवारपासुन लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी लेखनीबंद आंदोलन उभारले आहे. यात लघु पाटबंधारे उपविभागातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. यामुळे या विभागाचे कामकाज पुर्णपणे ठप्प झाले आहे. शासनाच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवाराची महत्वाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र याबाबद आता विद्युत जोडणी होईपर्यंत या विभागांतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती शासनाला देण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या विभागाची विद्युत जोडणी सुरु केल्यास अडचणी दूर होऊ शकते. (शहर प्रतिनिधी)कंत्राटदारांची देयकांसाठी पायपीटलघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत अनेक कंत्राटदार आहेत. त्यांनी शासनाच्या निर्देशानुसार या विभागाचे लाखोंची निविदा भरून ते काम केले आहेत. आता कामाच्या मोबदल्यात त्यांना देयके या विभागाकडून मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र या विभागाची वीज खंडीत करण्यात आल्याने येथील संगणकासह सर्व कामे बंद आहेत. त्यामुळे सदर कंत्राटदार देयकांच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांकडे विचारणा करीत आहेत. मात्र विद्युत नसल्याने अधिकारीही हतबल झाले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांचे दुर्लक्षलघुसिंचन विभागाची जबाबदारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आहे. जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी लघु सिंचाई विभागाकडे आहे. मात्र या विभागाने कामे पूर्ण केली नसल्याची बाब समोर आली आहे. अशातच उपविभागाची विद्युत जोडणी खंडीत करून जिल्हा परिषद अध्यक्षांना लघु सिंचाईच्या कामाच्या पूर्णतेची माहिती उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची आता गरज आहे. लघु सिंचाई विभागाच्या भंडारा उपविभागीय कार्यालयाला तात्पुरती वीज जोडणी व्यवस्था केली होती. त्यांना डीआरडीए मधूनही उसनवारीवर वीज जोडणी दिली. स्वत:ची वीज जोडणी घेण्याबाबत त्यांना पूर्वसूचना दिली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांची विद्युत जोडणी कपात करण्यात आल्याची लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. - जगन्नाथ भोर, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा
लपा उपविभागाची वीज कापली
By admin | Updated: July 20, 2016 00:29 IST