शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा सोंड्या शिवारात धुमाकूळ; जंगलशेजारील गावांत दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 16:00 IST

जंगलालगत असणाऱ्या सोंड्या गावातील रामप्रसाद लांजे यांच्या घराच्या अंगणातील शेळी बिबट्याने फस्त केली आहे. गावातील शेळ्या बिबट्या दररोज येऊन फस्त करीत असल्याने गावात दहशतीचे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसक्करधारा गावात शेळ्यांची शिकार

भंडारा : गेल्या आठवडाभरापासून सोंड्या गावशिवारात बिबट्याने शेळ्या व कुत्र्याची शिकार केली आहे. जंगल शेजारील गावात बिबट्याने धुमाकूळ माजविला आहे. सायंकाळ होताच घराच्या बाहेर पडणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. वन विभागाच्या यंत्रणेने उपाययोजना करण्याची मागणी जंगलशेजारील गावातील नागरिकांनी केली आहे.

सिहोरा परिसरात नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचा घनदाट जंगल विस्तारित असल्याने वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आहे. चांदपूरचे जंगल रामटेकपर्यंत विस्तारित असल्याने जंगलात वन्य प्राण्यांची रेलचेल आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचे जंगलात वन्य प्राण्यांच्या संख्येत मोठ्याने वाढ झाली आहे.

या जंगलात वाघ, अस्वल आणि बिबट्याचे संख्येत वाढ झाली आहे. जंगलाशेजारी असणाऱ्या मुरली गावात वाघ, बिबट्याचे दर्शन रोज नागरिकांना होत आहे. या हिंस्त्र प्राण्यांनी गावातील शेळ्या, कुत्र्यांची शिकार करण्यास सुरुवात केली आहे. घराच्या अंगणात असणाऱ्या शेळ्या ठार करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. शेळ्याची शिकार बिबट्याने केल्याचे प्रत्यक्षात अनेकांनी बघितले आहे. यामुळे जंगलशेजारील गावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जंगलालगत असणाऱ्या सोंड्या गावातील रामप्रसाद लांजे यांच्या घराच्या अंगणातील शेळी बिबट्याने फस्त केली आहे. रोज बिबट्या गावात दाखल होत आहे. यानंतर गणेश लांजे यांच्या घरी असणारी शेळी रात्रीच्या सुमारास ठार केली आहे. दररोज गावातील एक शेळी बिबट्या फस्त करीत असल्याने गावात दहशतीचे चित्र निर्माण झाले आहे.

सोमवारच्या रात्री गावातील वनवास तांडेकर यांच्या घराच्या अंगणात असणाऱ्या कुत्र्याची शिकार बिबट्याने केली. एकापाठोपाठ गावातील प्राण्यांची बिबट्याने शिकार केली आहे. सायंकाळ होताच बिबट्याच्या दहशतीने नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे बंद केले आहे. जंगलाच्या शेजारी असणाऱ्या सक्करधारा गावात बिबट्याने धुमाकूळ माजविला आहे. या गावात बिबट्याने अनेक शेळ्या, बकऱ्या व अन्य प्राण्यांची शिकार केली आहे.

गावात आदिवासी बांधवांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असून त्यांचा उदरनिर्वाह पशुपालन व्यवसायावर आहे. बिबट्याच्या दहशतीने पशुपालन व्यवसाय धोक्यात आलेला आहे. जंगलात जनावरांना चराईकरिता नेताना भीती निर्माण झाली आहे. नागरिकांचे जंगलात जाणे बंद झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याची ओरड नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याenvironmentपर्यावरण