शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

लाखांदूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ! श्वानासह ३६ कोंबड्या केल्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 13:25 IST

लाखांदूर तालुक्यात गत महिनाभरापासून वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून बुधवारी खैरीपट येथे रात्रीच्या सुमारास दोन बछड्यांसह मादी बिबटाने ३६ कोंबड्या व एका गावठी श्वानाला ठार मारल्याची घटना घडली.

ठळक मुद्देगावकरी भयभीतगावकऱ्यांनी फटाके फोडून बिबट व दोन बछड्यांना लावले हुसकावून

भंडारा : लाखांदूर तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरूच असून दोन बछड्यांसह मादी बिबटाने ३६ कोंबड्या व एका श्वनाला ठार मारल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील खैरीपट येथे बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गावकऱ्यांनी फटाके फोडून बिबट व तिच्या दोन बछड्यांना हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला.

खैरीपट येथील शेतकरी शुभम भागडकर यांचा गावाजवळ स्मशानभूमीलगत जनावारांचा कोठा आहे. बुधवारी रात्री ते नेहमी प्रमाणे आपला मित्र राकेश दोनाडकर सोबत गोठ्यात दूध काढायला गेले होते. दुध काढत असताना तेथे अचानक मादी बिबट तिच्या दोन बछड्यासह आली. बिबट्याला पाहताच या दोघांनी शेजारील एका घरात आश्रय घेतला. मात्र, बिबटाने गोठ्यातील ३६ कोंबड्या व एका गावठी श्वानाला ठार केले. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी दिली. गावकरी धावून आले. फटाके फोडून बिबटाला हुसकावून लावले. मात्र शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.

लाखांदूर तालुक्यात गत महिनाभरापासून वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून पंधारा दिवसापूर्वी दहेगाव जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या लाखांदूर येथील प्रमोद चौधरी याला बिबट्याने ठार मारले होते. तर सरांडी येथे रानडुकरांचा कळप भरवस्तीत शिरून एका बालकाला गंभीर जखमी केले होते. तर शेत गत आठवड्यात शेतात रानगव्याचे दर्शन झाले होते. या प्रकारामुळे तालुक्याती भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याenvironmentपर्यावरण