शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लेंडेझरी-तीर्थक्षेत्र गायमुख डांबरीकरणाचा रस्ता ठरतोय धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:30 IST

Bhandara : रस्त्यावर काय ते खड्डे... काय तो चिखल !

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : लेंडेझरी ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गायमुख रस्ता हा डांबरीकरणाचा असून, या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्यात पाणी साचले असून, चिखल व पाण्यातून ग्रामस्थांना रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यावर कोट्यवधींच्या निधी खर्च केला जातो, असे सांगण्यात येते, परंतु अल्पशा पावसातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुसळधार पावसात या रस्त्याला तलावाचे रूप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना काय खड्डे... काय चिखल... काय पाणी.... असे तोंडून आपसूकच निघते. 

लेंडेझरी हे गाव तुमसर मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण परिसर सातपुडा पर्वत रांगात येतो. घनदाट जंगल या परिसरात असून, आदिवासी बहुल असे हे क्षेत्र आहे. लेंडेझरी ते तीर्थक्षेत्र गायमुख, असा हा दहा ते बारा किलोमीटर अंतराचा रस्ता असून, हा रस्ता डांबरीकरणाचा आहे, परंतु या रस्त्यावरील डांबरीकरण संपूर्ण उखडले आहे.

रस्त्यातील गिट्टी बाहेर येऊन या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याची दुर्दशा होऊन रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळ्ळ्याला आता सुरुवात झाली. अल्पशा प्रमाणात या परिसरात पाऊस पडला आहे, परंतु या रस्त्यावरील खड्यात पाणी साचले असून, रस्ता चिखलमय व निसरडा झाला आहे.

या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील खड्यामधील असलेल्या पाण्याच्या अंदाज येत नाही, त्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. रस्त्यावर चिखल साचल्याने वाहने कुठून चालवावे, असा प्रश्न येथे नागरिकांना पडला आहे.

रस्ते बांधकामाकरिता उदासीनतापावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागातील रस्ते हे खड्डेमय होऊन निसरडे होतात. शेतात काम करणारे शेतकरी आपले साहित्य घेऊन याच रस्त्याने शेतात जातात. ते याच रस्त्याने परत घरी जातात, अशा वेळेस या चिखलमय व खड्डे असलेल्या रस्त्याने चालताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच, अनेक वेळा अपघाताची शक्यता येथे अधिक असते. बांधकाम विभागाने किमान या रस्त्यावर दुरुस्ती करण्याची गरज होती. या रस्त्याचे बांधकाम सहा ते सात वर्षांपूर्वी झाले होते, अशी माहिती पुढे येत आहे. या रस्त्याने जड वाहतूक नाही, त्यामुळे या रस्त्यावर खड्डे कसे पडले, हा संशोधनाचा विषय आहे. रस्त्याचे बांधकाम निकृष्ट का करण्यात आले, याची चौकशी करण्याची गरज आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाbhandara-acभंडारा