शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाश्ता करायला रुग्णालयातून दुचाकीने निघाला, अन् थेट एसटीवरच धडकला

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: August 23, 2023 09:18 IST

अगदी वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसवरच जाऊन धडकला.

गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा : लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेला युवक सकाळी नाश्ता करण्यासाठी चौकात दुचाकीने पोहोचला, परंतु अगदी वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसवरच जाऊन धडकला. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्याची पाळी आली. ही घटना बुधवारी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास लाखांदूर येथील छत्रपती शिवाजी टी पॉइंट परिसरात घडली. राहुल श्रीराम ढोरे (२४, चप्राड) असे जखमी दुचाकी चालक युवकाचे नाव आहे.

राहुल यांच्या नात्यातील महिला रुग्णालयात दाखल असल्याने तो मदतीसाठी रात्री  दवाखान्यातच थांबला होता. सकाळी भूक लागल्याने दवाखान्यातीलच एका व्यक्तीची दुचाकी (एम एच ३१ /बीझेड ७०४४) मागून तो नाश्ता करायला निघाला होता. नाश्ता आटोपून दवाखान्याकडे विरुद्ध दिशेने परत येताना लाखांदूर भंडारा मार्गावरील चौकात भंडारा आगाराची बस (एमएच ४० /एन ८८७१) वळण घेत असताना  धडक दिली. यात राहुल जखमी झाला.

ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ राहुलला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Accidentअपघात