शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

आरक्षण संपविण्याचा शासनाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:00 AM

काँग्रेस तीव्र लढा देईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. काँग्रेसने सोमवारी घरगुती गॅसच्या दरवाढ मागे घ्यावी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीला घेऊन आंदोलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना गणवीर बोलत होते.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एससी, एसटी व ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा भाजप व आरएसएस प्रणित शासनाचा डाव आहे. केंद्रातील भाजप सरकार आरक्षण सपवण्याचा प्रयत्नात असून काँग्रेस पक्ष हा कुटील डाव हाणून पाडेल. या विरोधात काँग्रेस तीव्र लढा देईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. काँग्रेसने सोमवारी घरगुती गॅसच्या दरवाढ मागे घ्यावी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीला घेऊन आंदोलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना गणवीर बोलत होते.केंद्रातील भाजप सरकारविरूद्ध भाजप हटाव आरक्षण बचाव या अंतर्गत सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, विकास राऊत, माणिकराव ब्राम्हणकर, मधूकर लिचडे, प्रकाश पचारे, सुरेश मेश्राम, रविभूषण भुसारी, महेंद्र निंबार्ते, मुकूंद साखरकर, अमरनाथ रगडे, रेखा वासनिक, प्रेम वनवे, होमराज कापगते, उत्तम भागडकर, मंगेश हुमणे आदी उपस्थित होते.सोमवारी येथील त्रिमुर्ती चौकात काँग्रेस जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठिय्या देण्यात आला. यावेळी उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केले. आरक्षण विरोधी मुद्यावर भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. काँगे्रस पक्ष मागासवर्गीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी काँग्रेस मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले.लाखनीतही निषेधलाखनी : येथील महिला काँग्रेस कमिटीतर्फे मीनाक्षी बोपचे यांच्या नेतृत्वात गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. तहसीलदार मल्लीक विराणी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रजनी मुळे, मुरमाडीच्या सरपंच सुनिता भालेराव, माधवी बावनकुळे, सविता गौरे, शांता भोसकर, प्रिया खंडारे, जिजा तुमडाम, मोनाली गाढवे, रूपलता जांभुळकर, रजनी आत्राम, कल्पना भिवगडे, मुनेश्वरी पटले, संध्या धांडे आदी उपस्थित होते.प्रति सिलिंडरमागे दरवाढतेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत १४४ रूपये प्रती सिलिंडर वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडर ९१४ रूपयात प्रती सिलिंडर मिळत आहे. या दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून आर्थिक बजेट कोलमडले आहे. ही भाव वाढ त्वरीत मागे घेण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.