शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

नेते-अभिनेत्यांनी गाजविल्या जिल्ह्यात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:54 IST

लोकसभेच्या प्रचाराचा हंगाम सुरु आहे. उष्णतेचा तडाख्यात नेते प्रचारात गुंतले आहेत. प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांचे दर्शन सुलभ होते. अशाच निवडणुकीच्या प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांना बघण्याचा योग मोहाडीकरांना आला. तसेच अभिनेत्यांनाही जवळून बघता आले.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : अभिनेत्यांच्या सभेची ग्रामीण भागात उत्सुकता

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : लोकसभेच्या प्रचाराचा हंगाम सुरु आहे. उष्णतेचा तडाख्यात नेते प्रचारात गुंतले आहेत. प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांचे दर्शन सुलभ होते. अशाच निवडणुकीच्या प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांना बघण्याचा योग मोहाडीकरांना आला. तसेच अभिनेत्यांनाही जवळून बघता आले.लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी थांबायला आठ-नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मोठमोठे नेते सभेच्या मैदानात उतरणार आहेत. अशा या निवडणुकीच्या रणसंग्रामात सामान्य नजतेला दिग्गज नेत्यांना बघण्याची संधी मिळत असते. मागील लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मोहाडीकरांनी दिग्गज नेत्यांचे दर्शन केले आहेत.मोहाडीच्या भूमिला शरद पवार, आर.आर. पाटील, छगन भुजबळ, सुनील दत्त, शालिनीताई पाटील, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, कमुनिष्ट पक्षाचे ए. बी. बर्धन, डी. राजा, अ‍ॅड. गोविंद पानसरे, माधवराव गायकवाड, अतुलकुमार अंजान, तसेच भाजपाचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे, उमा भारती, मेनका गांधी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांचे पाय पडले. तसेच अभिनेत्यापैकी प्रसिध्द अभिनेते जितेंद्र, सुनील शेट्टी, असरानी, मुकेश खन्ना, वर्षा उसगावकर यांचेही दर्शन झाले. तसेच भारताच्या इतिहासात भंडारा-गोंदियाचा नाव झळकविणारे राष्टÑवादीचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी तर आपल्या राजकीय कारकिर्दीत गाव अन् गाव पिंजून काढले आहे.मोजून आता आठ-नऊ दिवस प्रचाराला शिल्लक आहेत. पण मोहाडी येथे एकही दिग्गज नेता- अभिनेता प्रचाराला आलेला नाही. रखरखत्या उन्हात, तप्त मातीवर मोहाडीस आधी कोण पाय ठेवतो याची प्रतीक्षा मोहाडीकरांना लागली आहे.मोहाडीत इंदिरा गांधींची सभा१९७७ ते मागील २०१८ पर्यंतचा कालखंडात नजर टाकली असता सर्वप्रथम आठवण होते. नेतृत्वाची कमान सांभाळलेल्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची. त्या हुतात्मा स्मारकाच्या परिसरात प्रचारासाठी आल्या होत्या. त्यांना बघायला परिसरातील जनता बैलगाडी, खाचर, सायकल व पायदळ आली होती. खूप रात्री झाली असतांनाही इंदिराजींची एक झलक बघण्यासाठी आतुरलेल्या थोर महिला पुरुष बालकांनी सुध्दा जागा सोडली नव्हती.