शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

सर्वपक्षीय नेत्यांची ‘आघाडी’

By admin | Updated: July 25, 2016 00:40 IST

राजकारणात कायम कुणीच कुणाचा शत्रू व मित्र राहत नाही. वेळ, काळ व प्रसंग पाहून आपले पत्ते उघड करावे लागतात.

तत्वप्रणालीला मुठमाती : निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समितीचीमोहन भोयर  तुमसरराजकारणात कायम कुणीच कुणाचा शत्रू व मित्र राहत नाही. वेळ, काळ व प्रसंग पाहून आपले पत्ते उघड करावे लागतात. केंद्र व राज्यात भाजप, काँग्रेस, राकाँ व सेनेत विस्तव जात नाही. परंतु तुमसर - मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हातात हात घालून निवडणुक लढवित आहेत. वरिष्ठांचे तसे निश्चितच निर्देश प्राप्त झाले असावेत. शनिवारी माजी केंद्रीय मंत्री तथा राकाँचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी तुमसरात काँग्रेसचे माजी नगरसेवकाच्या घरी नगरपरिषद व बाजार समितीच्या निवडणुकीबाबत बैठक घेतली.तुमसर - मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल विदर्भात तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी कोट्यवधींची येथे उलाढाल होते. त्याहीपेक्षा तुमसर व मोहाडी तालुक्यातील ग्रामीण राजकारणावर अतिशय प्रभाव पाडणारी ही एकमेव संस्था आहे. प्रत्यक्ष पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक जरी होत नाही, परंतु प्रत्येक पक्ष येथे बाजार समितीवर आपल्या पक्षाचा कब्जा राहावा याकरिता पडद्यामागून हालचाली सुरु आहेत. वरिष्ठ नेत्यांनी तशा सूचना स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिल्या असल्याचे बोलले जात आहे.येथे तीन आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. यात बळीराजा जनहीत पॅनल, शेतकरी आघाडी व स्वाभीमानी किसान आघाडी यांचा समावेश आहे. यातील पॅनलमध्ये भाजप - काँग्रेस - राष्ट्रवादी काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस - भाजप, शिवसेना - काँग्रेस अशी उमेदवारांनी युती केली आहे. येथे एका पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या प्रभावशाली व श्रीमंत उमेदवारांनाच आघाडीत स्थान देण्यात आले. राजकारणाचा नवीन पॅटर्न येथे सध्या दिसत आहे. तत्वप्रणालीला येथे मुठमाती देण्यात आली. प्रत्येक आघाडीतील त्या - त्या पक्षाचे वरिष्ठ नेते येथे मार्गदर्शकाची भूमिका पडद्यामागून बजावित आहेत, हे विशेष. अर्थकारणाला येथे गती प्राप्त झाली आहे.एकूण मतदार तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत १९ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. त्यात एकूण ३,८०९ मतदार आहेत. यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातून ११ संचालक (मतदार १२९०), ग्रामपंचायत गट चार, संचालक (मतदार १४२१), अडत्या-व्यापारी गट दोन (मतदार ६१७), हमाल-मापारी गट एक (मतदार ४०६), पणन (मतदार ७५), १९ संचालक पदाकरिता ७० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सेवा सहकारी संस्था गटाकरिता ३८, ग्रामपंचायत गट १७, अडत्या -व्यापारी पाच, हमाल-मापारी सहा, पणन प्रक्रिया चार असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.निवडणूकतुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २१ आॅगस्ट रोजी मतदान पार पडणार असून २२ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. सात वर्षानंतर येथे बाजार समितीची निवडणूक होत आहे. सध्या मतदारात निरुत्साह दिसून येत आहे. कोट्यवधींची लढालाढ करून नफा कमविणाऱ्या समितीकडून शेतकऱ्यांना सोयीसुविधा पुरवित नसल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. आलटून पालटून तेच ते सहकार क्षेत्रातील तथा पक्षांचे पदाधिकारी येथे निवडणूक लढवितात. या बाजार समितीचा प्रत्यक्ष राजकारणावर काय प्रभाव पडतो हा संशोधनाचा विषय आहे. केवळ राजकीय पदाधिकाऱ्यांचे पुनर्वसन करणारी संस्था अशी स्थिती आज बाजार समितीची झाली आहे.ईश्वरदयाल पटले यांनी बाजार समितीचा चेहरामोहरा बदलविला होता. त्यापुढील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. ही खरी वस्तूस्थिती आहे. लोकप्रतिनिधींकडून निधी प्राप्त करून इमारतींचे जाळे तेवढे निर्माण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या तोंडाला येथे केवळ पाने पुसण्यात आली. ही निवडणूक केवळ व्यवसायीक झाली आहे. योग्य सक्षम संचालक निवडून येण्याची गरज आहे.- गजानन लांजेवारअध्यक्ष, तुमसर तालुका सरपंच संघटना