शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बनावट बियाणे विक्रीविरूद्ध कायदा हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:12 IST

जागतिक पातळीवर ज्या ९३ बनावट किटकनाशकावर बंदी घालण्यात आली आहे, त्या किटकनाशकांची भारतात खुलेआम विक्री सुरू आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार प्रश्न

आॅनलाईन लोकमतभंडारा : जागतिक पातळीवर ज्या ९३ बनावट किटकनाशकावर बंदी घालण्यात आली आहे, त्या किटकनाशकांची भारतात खुलेआम विक्री सुरू आहे. यासाठी विदेशात कायदा तयार करण्यात आलेला आहे. भारतात हा कायदा नसल्यामुळे अशा किटकनाशकावर भारतातही बंदी घालण्याची गरज आहे, किटकनाशक व बनावट बियाणे विक्रीसाठी सबळ कायदा करण्यात यावा, हा विषय संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कायदा व्हावा यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्याशी नागपुरात चर्चा केल्याचे सांगून खा.पटोले म्हणाले, मागीलवर्षी खरेदी करण्यात आलेली तुर डाळ बाजार समितींमध्ये पडून आहे. ज्या शेतकऱ्यांकडून ही डाळ खरेदी करण्यात आली त्यांना अद्याप पैसे मिळाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊन साडेचार महिने लोटले असले तरी अद्याप शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. यावर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचे सावट उद्भवणार असल्याची शक्यता वर्तवून यातून सुटका करण्यासाठी मालगुजारी तलावांचे खोलीकरण करून हे तलाव गाळमुक्त करण्याची गरज आहे. यासाठी मनरेगाचे निकष न लावता हे तलाव सरसकट खोल करण्याची गरज आहे. तेव्हाच त्याचा लाभ शेतकºयांना होऊ शकेल, असे सांगितले.पुण्यात करणार गौप्यस्फोटमाजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या उपस्थितीत पुणे येथे आयोजित कार्यक्रमात मालेगाव येथील बॉम्बस्फोटप्रकरणी गौप्यस्फोट करणार असल्याचे खा.पटोले यांनी सांगितले. या कार्यक्रमात यशवंत सिन्हा हे जीएसटी, नोटाबंदी या विषयावर बोलणार आहेत.असे म्हणणे चुकीचेयवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारणीमुळे ज्या शेतकºयांचा मृत्यू झाला, त्यांचा मृत्यू किटकनाशकामुळे झाला नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांचा मृत्यू किटकनाशकामुळे झाला नव्हता तर त्यांच्यावर किटकनाशकाचा प्रभाव झाला म्हणूनच उपचार करण्यात आले होते, त्यामुळे या शेतकºयांचा मृत्यू किटकनाशकामुळे झाला नाही, असे म्हणने चुकीचे असल्याचे खा.पटोले यांनी सांगितले.