शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभिप्राय नोंदविण्याची सुरुवात लाखांदुरातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:50 IST

भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा देशव्यापी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत काल शुक्रवारी स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी लाखांदूर तालुक्यात एकाच दिवशी गटविकास अधिकारी श्री देविदास देवरे यांचे नेतृत्वात विशेष मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देगावागावांत मार्गदर्शन : तालुक्यात ग्रामस्तरावर शुक्रवारी एकाच दिवशी नोंदविल्या हजारो प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा देशव्यापी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत काल शुक्रवारी स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी लाखांदूर तालुक्यात एकाच दिवशी गटविकास अधिकारी श्री देविदास देवरे यांचे नेतृत्वात विशेष मोहीम राबविण्यात आली. ग्रामस्तरावरील अन्ड्राईड मोबाईल धारकांनी स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविवावा या करीता अधिकारी-कर्मचारी यांनी गावागावात जावून स्थानिक लोक प्रतिनिधी, कर्मचारी यांचे पुढाकारातून अभिप्राय नोंदविण्यात आला. छोटेखानी मार्गदर्शन कार्यक्रम व त्यानंतर चळवळ स्वरूपात मोहीम राबवून नागरिक, महिला पुरूष,विदयार्थी, तरूण मंडळी यांना स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनाला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला असून मोबाईल धारकांनी एस एस जी १८ या मोबाईल अ‍ॅपद्वारे हजारो प्रतिक्रीया नोंदविण्यात आल्या.भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्हयात मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री रविंद्र जगताप यांचे मार्गदर्शनात, उप मुख्य कार्य कारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री सपाटे यांचे नेतृत्वात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या सर्वेक्षणांतर्गत ग्रामस्तरावरील सार्वजनिक स्थळे शाळा, अंगणवाडी, ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद, उपकेंद्र, धार्मिक स्थळ, बाजाराची ठिकाणे व गावातील अन्य महत्वाचे सार्वजनिक स्थळांची स्वच्छतेबाबत केआरसीच्या वतीने पडताळणी करण्यात आली. तसेच स्वच्छतेबाबत ग्राम सेवक, आशा, अंगणवाडी सेवीका, ग्रामस्थांची या सर्वेक्षणाच्या माध्यमातून केआरसी वतीने मते जाणून घेण्यात आली. केआरसी च्या वतीने सार्वनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण, शासनाच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे स्वच्छता विषयक सदयास्थिती व मुख्य प्रभावी व्यक्तींची माहिती, मते, अभिप्राय घेण्यात आले आहे. स्वच्छतेसोबतच मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वच्छतेबाबत ५ टक्के प्रतिक्रीया एस एस जी १८ या मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदवावयाच्या आहेत. संपूर्ण भंडारा जिल्हयात मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वच्छतेबाबत सकारात्मक प्रतिक्रीया नोंदविण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व पंचायत समिती स्तरावरून नियोजन करण्यात आलेले आहे. तालुकास्तरावरील अधिकारी ,कर्मचारी, स्थानिक लोक प्रतिनिधी व कर्मचारी यांनी सहकायार्ने भंडारा जिल्हयाची स्वच्छतेची क्रमवारी वाढविण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. २४ आॅगस्ट ला शुक्रवारी सर्वप्रथम लाखांदूर तालुक्यात एकाच दिवशी ग्रामस्तरावर स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी गटविकास अधिकारी श्री देविदास देवरे यांचे नेतृत्वात पुढाकार घेण्यात आला. विविध बैठका घेवून ही विशेष मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आलेतालुकास्तरावरून अधिकारी, विभाग प्रमुख,विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व अन्य अधिकारी यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ग्रामस्तरावर ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांचे नेतृत्वात कर्मचारी, ग्रा.पं. पदाधिकारी, विविध समित्यांचे पदाधिकारी यांची चमू तयार करून वैयक्तीक व सार्वजनिक स्तरावर अभिप्राय नोंदविण्यासाठी नियोजन करण्यात आले. ग्रामस्तरावरील चमूच्या माध्यमातून गावातील ?न्ड्राईड मोबाईल धारकांकडे या चमूने जावून त्यांना स्वच्छतेबाबत माहिती दिली.त्यांनतर त्यांच्याकडून प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी मोबाईल ?पद्वारे स्वच्छतेबाबत विचारण्यात आलेल्या चार प्रश्नांची सकारात्क उत्तरे देवून प्रतिक्रीया नोंदविण्यात आल्या आहेत.स्वच्छतेबाबत अभिप्रायस्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी लाखांदूर तालुक्यात एकाच दिवशी विशेष मोहीम राबविल्यानंतर सोमवारी २७ आॅगस्ट ला तुमसर, साकोली, पवनी पंचायत समिती अंतर्गत ग्रामस्तरावर एसएसजी १८ या मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तुमसर येथे गटविकास अधिकारी प्रकाश निर्वाण, साकोली येथे गटविकास अधिकारी तडस तर पवनी येथे गटविकास अधिकारी अनिता तेलंग यांचे नेतृत्वात या विशेष मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरावरून संपर्क अधिकारी म्हणून अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामस्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे नेतृत्वात त्यांचे कार्यरत कर्मचारी, ग्राम पंचायत पदाधिकारी, विविध समित्यांचे पदाधिकारी, स्वछता दूत व प्रभावी व्यक्तींच्या सहायाने ग्रामस्तरावर,गृहभेटी व सामूहिकरित्या भेटी घेवून स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात येईल व प्रतिक्रीया नोंदवून घेण्यात येईल. तालुका व स्थानिक स्तरावर या बाबत नियोजन करण्यात आले असून २७ आॅगस्टला एकाच दिवशी तुमसर, साकोली व पवनी तालुक्यात हया विशेष मोहीमेद्वारे हजारों प्रतिक्रीया नोंदविण्यात येणार आहे.