शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘रोपे आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: June 27, 2017 00:33 IST

कांद्री वनविभागांतर्गत शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत रोपे आपल्या दारु या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

कांद्री वनविभाग : चरण वाघमारे यांनी केले वाटपलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : कांद्री वनविभागांतर्गत शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत रोपे आपल्या दारु या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसील कार्यालय मोहाडीच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमाला आमदार चरण वाघमारे यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते रोपे वितरीत करण्यात आली.कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती हरिश्चंद्र बंधाटे, उपसभापती विलास गौपाले, पं.स. सदस्य जगदीश उके, भारत टेकाम, उमेश पाटील, किरण भैरम, निता झंझाड, निशा कळंबे, पुष्पा भुरे, वनपरिक्षेत्राधिकारी चकोले, क्षेत्र सहाय्यक एम.एम. धकाते, एच.एस. पठाण, आर.टी. मेश्राम, वाय.ए. बावनथडे, गालीवार व सर्व वनरक्षक, वनमजूर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.रोपे आपल्या दारु या योजनेअंतर्गत वनविभागाच्या कांद्री वनक्षेत्राच्या हद्दीतील नागरिकांना एका फोनवर रोपे घरपोच मिळणार आहेत. या रोपाची किंमत अल्प प्रमाणात सहा रुपये ते ११ पर्यंत ठेवण्यात आली आहे. खैर, काशिद, शिरस, आॅस्ट्रेलियन बाभूळ, करंजी, काठसादर, चिंच, आवळा, सीताफळ, जांभुळ, कवट, बेहडा, चारोळी यांचे रोपेही सहा रुपयाप्रमाणे मिळणार आहेत. गुलमोहर, अंमलनरु, रेन्ट्री सात रुपये प्रमाणे तर शिवण, बांबू, सागवान यांची रोपे ११ रुपये प्रमाणे मिळणार आहेत. या रोपांची स्टॉल तहसील कार्यालय मोहाडी येथे ३० जूनपर्यंत लावण्यात आलेले आहेत. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेला यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा व पर्यावरणाचे रक्षण करावे असे प्रतिपादन आ.चरण वाघमारे यांनी केले.