शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

बांधावर खते-बियाणे योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:01 IST

आजघडीला देशातील सर्व इंडस्ट्रीज मोठ्या जोमाने सुरु आहे. शेतकऱ्यांवर जर कोरोना विषाणूचे आक्रमण झाले तर अख्या देश भुकेने तळपतील, यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये व कोरोना विषाणू शेतकऱ्यांपासून खूप दूर राहावा, या उद्दात्त हेतूने शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे ही योजना अंमलात आणली. ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

ठळक मुद्देदिघोरी येथे आयोजन : लाखांदूर तालुका कृषी विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : लाखांदूर तालुका कृषी विभागाच्या वतीने दिघोरी (मोठी) येथे बांधावर खते-बियाणे योजनेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी पंचायत समिती सभापती मंगला बगमारे, जिल्हा परिषद सदस्य माधुरी हुकरे, पंचायत समिती सदस्य गुलाबराव कापसे, सरपंच अरुण गभने, तालुका कृषी अधिकारी बालाजी शेन्नेवाड, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष महादेव कांबळे, कृषी विस्तार अधिकारी प्रमोद वानखेडे, कृषी सहायक काकडे आदी उपस्थित होते.याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी बालाजी शेन्नेवाड म्हणाले, कोरोना विषाणूशी संपुर्ण देश लढा देत आहे आणि या लढ्याला जीवंत ठेवण्याचे काम शेतकरी करीत आहे. अख्या जगाची भूक मिटविण्यासाठी शेतकरी प्रतिकुल परिस्थितीत अन्न पिकवित असतो. आजघडीला देशातील सर्व इंडस्ट्रीज मोठ्या जोमाने सुरु आहे. शेतकऱ्यांवर जर कोरोना विषाणूचे आक्रमण झाले तर अख्या देश भुकेने तळपतील, यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये व कोरोना विषाणू शेतकऱ्यांपासून खूप दूर राहावा, या उद्दात्त हेतूने शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे ही योजना अंमलात आणली. ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. गटाच्या माध्यमातून रासायनिक खते, बि-बियाणे खरेदी केल्याने कृषी केंद्रात गर्दी होणार नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता कमी होईल. गटाच्या माध्यमातून एकावेळेस जास्त निविष्ठा खरेदी केल्या जात असल्याने भाव वाजवी मिळेल. यावेळी शेतकरी ललीराम खंडाईत, रवी करंजेकार, बाबुराव देशमुख, सुरेश कढाणे, मुखरु कापसे, मुखरु सेलोकर, यशवंत हटवार उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती