शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

अखेर पालकांनीच दिले ‘नवोदय’ला सौर हिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:34 IST

जवाहर नवोदय विद्यालय ऐनकेन प्रकारे चर्चेत राहत असून याचा त्रास तेथे शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना होत आहे. हिवाळ्याच्या दिवसातही या विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आघोळ करावी लागत होती. हा प्रकार पालकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.

ठळक मुद्दे५० हजारांची लोकवर्गणी : प्रशासनाने केले होते हात वर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जवाहर नवोदय विद्यालय ऐनकेन प्रकारे चर्चेत राहत असून याचा त्रास तेथे शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना होत आहे. हिवाळ्याच्या दिवसातही या विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आघोळ करावी लागत होती. हा प्रकार पालकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र कोणतीही उपाययोजना झाली नाही. अखेर पालकांनी एकत्र येवून लोकवर्गनी केली आणि त्यातून ५० हजार रुपये किंमतीचे सौर उर्जा हिटर नवोदय विद्यालयाला भेट दिले.भंडारा जिल्ह्याला हक्काचे नवोदय विद्यालय मिळावे म्हणून विविध आंदोलने करण्यात आली. अखेर याला यश आले. भंडारा जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालय मंजूर झाले. मात्र जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला जकातदार विद्यालयाच्या जुन्या इमारतीत नवोदय सुरु झाले. जिल्ह्याभरातील प्रज्ञावंत विद्यार्थी येथे शिक्षण घेवू लागले. मात्र याठिकाणी कोणत्याही सोईसुविधा नसल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यानंतर आंदोलन सुरु झाले. प्रशासनाने अल्पसंख्याक विभागाच्या इमारतीत नवोदय विद्यालय हलविले. परंतु त्यावरही पालकांचा आक्षेप होता. अखेर मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीत नवोदय सुरु करण्यात आले.मात्र या इमारतीत कोणत्याही सुविधा नाही. सहावी आणि सातवीचे जिल्हाभरातील विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सुरवातीला झोपण्यासाठी बेडही नव्हते. त्यावरुन बँक आॅफ इंडियाने आपल्या सामाजिक उपक्रमांतर्गत तेथे बेडची व्यवस्था केली. मात्र समस्या विद्यार्थ्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. हिवाळ्यात विद्यार्थ्यांना येथे थंड पाण्याने आंघोळ करावी लागत होती. पालकांनी प्रशासनाला निवेदन दिले. पंरतु प्रशासनाने हात वर केले. आपली मुले कुडकुडत्या थंडीत थंडगार पाण्याने आंघोळ करीत आहेत. आरोग्यावर परिणाम होईल म्हणून पालक अस्वस्थ झाले. प्रशासन ऐकत नसल्याचे पाहून पालकांनीच पुढाकार घेतला. जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती आणि पालकांकडून वर्गणी गोळा केली. तब्बल ५० हजार रुपये गोळा झाले. यातून सौरउर्जा हिटर विकत घेवून नवोदयमध्ये लावण्यात आले.शुद्ध पाण्याचा अभावनवोदय विद्यालयात पाणी शुध्दीकरणाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे उपलब्ध असलेले अशुध्द पाणी विद्यार्थ्यांना प्राशन करावे लागते. आता आरो वॉटर प्लांट लावण्यासाठी पालकच पुढाकार घेत असून त्यासाठी पुन्हा लोकवर्गणी करण्याची तयारी पालकांनी चालविली आहे.

टॅग्स :Schoolशाळा