शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

१०६ वर्षांच्या नागभीड पॅसेंजरला अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

नॅरोगेज असलेल्या या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाला सुरुवात होणार असून १ डिसेंबर पासून हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तत्पूर्वी ही मीनी पॅसेंजर बंद करण्याचा रेल्वे विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी या पॅसेंजरची शेवटची फेरी होती. १९९३ पासून ही गाडी नॅरोगेज रेल्वे मार्गावरून अखंडपणे धावत होती.

ठळक मुद्देरेल्वे मार्गाचे विस्तारीकरण : शेवटच्या दिवशी अनेकांनी केला प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : तब्बल १०६ वर्षापासून प्रवाशांसाठी अखंडपणे सेवा देणाऱ्या नागपूर नागभीड मिनी पॅसेंजर यापुढे या मार्गावरून धावणार नसल्याने शेवटच्या दिवशी तिला प्रवाशांनी भावपूर्ण अखेरचा निरोप दिला.नॅरोगेज असलेल्या या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाला सुरुवात होणार असून १ डिसेंबर पासून हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तत्पूर्वी ही मीनी पॅसेंजर बंद करण्याचा रेल्वे विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी या पॅसेंजरची शेवटची फेरी होती. १९९३ पासून ही गाडी नॅरोगेज रेल्वे मार्गावरून अखंडपणे धावत होती.नागपूर ते नागभिड पर्यंतच्या गावांसाठी ही गाडी अत्यंत सोयीस्कर होती. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी नोकरवर्गातील प्रवाशी सुद्धा याच गाडीने आवडीने प्रवास करीत होते. १९५२ पासून रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी मागणी सुरु होती. या मागणीचा पाठपुरावा झाला मात्र अपेक्षित पाठपुराव्याअभावी ही मागणी अर्धवट राहिली. तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात १०६.१५ किमी लांबीच्या नॅरोगेज मार्गांना ब्रॉडगेड करण्याची परवानगी देण्यात आली होती. ही गाडी बंद झाल्याने अनेक प्रवाशांनी गाडीच्या अखेरच्या दिवशी भावपूर्ण जड अंत:करणाने निरोप दिला.अर्थसंकल्पात तरतूदतत्कालीन रेल्वे मंत्र्यांच्या कार्यकाळात या गाडीला ब्रॉडगेज करण्याची परवानगी मिळाल्यानंतर अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली नव्हती. परंतु या मार्गासाठी अंदाजे ७०८.११कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यातील निम्मा वाटा राज्य सरकार उचलणार असल्याचे कळते. ९२२ कोटी रुपयांच्या निधीतून १०६.१५ किमी विस्तारीकरणाला आता येत्या १ डिसेंबर पासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. विस्तारीकरणानंतर नागभिड मार्ग हा चंद्रपूर मार्गे वडसा गडचिरोली सोबतच मुंबई नागपूर गोंदिया कोलकाता तर दुसरीकडे चंद्रपूर मार्गे हैद्राबादला जोडला जाणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे