शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

तुमसर टाऊन रेल्वेस्थानक मोजतेय शेवटची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

ब्रिटिशांनी १९०२ च्या सुमारास तुमसर ते तिरोडीदरम्यान रेल्वे ट्रॅक तयार केले होते. त्यावेळी मँगेनिज वाहतूक करण्यासाठी रेल्वेस्थानकाचे बांधकाम करण्यात आले. तुमसर तालुका मुख्यालय असून येथे मोठे रेल्वेस्टेशन होते. परंतु, काळाच्या ओघात रेल्वेस्टेशन आपली ओळख विसरले. रेल्वेस्थानकाचे आयुष्य संपल्यागत झाले आहे. ब्रिटिशकाळात येथे मँगेनिजसाठा करणारे केंद्र होते. येथून मँगेनिजची उचल देश-विदेशांत होत होती. त्यानंतर प्रवासी गाडी सुरू करण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ब्रिटिशकालीन तुमसर टाउन रेल्वेस्थानक शेवटची घटका मोजत असून इमारतीचे आयुष्य संपल्यात जमा आहे. तालुकास्थळावरील रेल्वेस्थानकात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून परिसरात गवत व झुडुपी वनस्पती वाढल्या आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी साधी जागाही नाही.ब्रिटिशांनी १९०२ च्या सुमारास तुमसर ते तिरोडीदरम्यान रेल्वे ट्रॅक तयार केले होते. त्यावेळी मँगेनिज वाहतूक करण्यासाठी रेल्वेस्थानकाचे बांधकाम करण्यात आले. तुमसर तालुका मुख्यालय असून येथे मोठे रेल्वेस्टेशन होते. परंतु, काळाच्या ओघात रेल्वेस्टेशन आपली ओळख विसरले. रेल्वेस्थानकाचे आयुष्य संपल्यागत झाले आहे. ब्रिटिशकाळात येथे मँगेनिजसाठा करणारे केंद्र होते. येथून मँगेनिजची उचल देश-विदेशांत होत होती. त्यानंतर प्रवासी गाडी सुरू करण्यात आली. दिवसातून या मार्गावर चार वेळा प्रवासी गाडी ये-जा करते. दरदिवशी ४०० ते ५०० प्रवासी प्रवास करतात. तुमसर शहराची लोकसंख्या सुमारे ६० हजार आहे. रेल्वे प्रशासनाने येथील रेल्वेस्थानकात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. रेल्वे प्रवाशांना बसण्याकरिता येथे बाके नाहीत. त्यामुळे शेकडो प्रवाशांना उभे राहूनच प्रतीक्षा करावी जागते. शेड नसल्याने पावसाळा, उन्हाळ्याच्या दिवसांत झाडाखाली आसरा घ्यावा लागतो.रेल्वेस्थानकाची मुख्य इमारत लहान असून तिचे आयुष्य संपले आहे. येथे भाडेतत्त्वावर रेल्वे प्रशासनाने तिकीट विक्री केंद्र सुरू केले आहे. संपूर्ण रेल्वेस्थानक परिसरात गवत व खुरट्या वनस्पती वाढल्या आहेत. तुमसर रोड रेल्वेस्थानक येथून केवळ पाच किलोमीटर अंतरावर आहे. तेथून हावडा-मुंबई रेल्वेमार्ग जातो. तिरोडी, कटंगी, बालाघाट, जबलपूर असा रेल्वेमार्ग या स्थानकातून जातो. तरी, हा महत्त्वपूर्ण रेल्वेमार्ग आजही उपेक्षित आहे.

रेल्वेमंत्र्यांना निवेदनस्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठविले आहे. त्यात या रेल्वेमार्गावर दुस-या रेल्वे ट्रॅकचे बांधकाम करण्यात यावे. प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी. प्रतीक्षालयाचे बांधकाम,  आरक्षणाची सोय, प्रवाशांना बसण्यासाठी शेडनिर्मिती, रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अत्याधुनिक रेल्वेस्थानक येथे बांधकाम करण्याची मागणी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ. चंद्रशेखर भोयर, नगरसेवक रजनीश लांजेवार, पंकज बालपांडे, सचिन बोपचे, श्याम धुर्वे, सुनील पारधी, मुन्ना पुंडे, रेल्वे समिती सदस्य आशिष कुकडे,  काशिराम टेंबरे, यशवंत कुर्जेकर, हनुमंत मेटे, कन्हैयालाल जीभकाटे यांनी केली आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे