शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

गावतलाव मोजताहेत अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:22 IST

मालगुजारी काळापासून गावात उताराच्या ठिकाणी तलाव बांधल्या गेले. या तलावामुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली. काळानुरुप तलावाची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आता गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत.

ठळक मुद्देखोलीकरणाची गरज : दुर्लक्षामुळे गावागावांना बसतोय पाणीटंचाईचा फटका

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : मालगुजारी काळापासून गावात उताराच्या ठिकाणी तलाव बांधल्या गेले. या तलावामुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली. काळानुरुप तलावाची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आता गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत.भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावाच्या भरोश्यावर भात शेती केली जाते. गुराढोरांची तहान भागते. नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळते. तलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ व्हायची. पंरतू आता सर्वच तलावच धोक्यात आले आहेत. पाणी बचतीकडे जसे दुर्लक्ष झाले तसेच तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुर्वी अथांग दिसणारे तलाव आता डबक्या समान झाले आहे. परिणामी गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहे.या गावतलावांचे पुर्नरुज्जीव करण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन वर्षापुर्वी लाखनीचे तहसीलदार राजीव शक्करवार व नायब तहसीलदार विनोद थोरवे यांनी लोकसहभागतून गाळ उपसा केला. त्यावेळी नागरिकांनी सहकार्य केले. पंरतू आता याकडे दुर्लक्ष होत आहे.देवरीगोंदी तलावाचे असेच ४० वर्षांपासून भिजत घोंगडे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी आमदार बाळा काशिवार यांना तलावाची हकीकत सांगितली. त्यानंतर या तलावाचे काम हाती घेण्यात आले. वर्षभरात तलाव व कालव्याचे काम केले. दृष्काळ सदृष्य परिस्थितीत हा तलाव आता जीवनदायी ठरत आहे. असेच सर्व तलावांसाठी केल्यास जिल्ह्यातील तलाव उन्हाळ्यातही पाण्याने तुडूंब भरुन राहतील.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई