शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

भूमी अभिलेख परिनिरीक्षकाला अटक

By admin | Updated: June 7, 2015 00:44 IST

जमिनीच्या नकाशात फेरबदल करून न्यायालयाची दिशाभूल करण्याच्या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे ..

चार आरोपींची जमानत रद्द : जमिनीच्या नकाशात खोडतोड करून फेरबदलगोंदिया : जमिनीच्या नकाशात फेरबदल करून न्यायालयाची दिशाभूल करण्याच्या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे परिनिरीक्षक ललितकुमार बहेकार (४९) याला शहर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात सादर केल्यावर ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणात न्यायालयाने आधीच चार जणांचे जमानत अर्ज रद्द केले आहेत. या प्रकरणात अनेक जणांचे चेहरे उघड होतील व नगर परिषदेचे काही अधिकारीसुद्धा यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सिव्हील लाईन्स गोंदिया येथील रहिवासी वसंत ठाकूर यांनी न्यायालयात एक प्रकरण दाखल केले आहे. याच आधारावर न्यायालयाने फौजदारी संहितेच्या कलम १५६ (३) अन्वये प्रकरण दाखल करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले होते. सदर प्रकरणाच्या तपासणी दरम्यान अर्जदार चंदन भौमिक यांनी गोंदिया नजूल शीट-४९ (क) प्लॉट-१६७ च्या उपहिस्याची गणना करण्यासाठी अर्ज केल्यावर जमीन मोजमाप करण्यात आली. यात क्रमांक-२ वर उपहिस्सा कामय करण्यात आले नाही, असे मत नोंदवून चंदन भौमिक यांना मोजमापची ‘क’ प्रती ३० जुलै २०१३ रोजी उपलब्ध करविण्यात आली.या प्रतच्या आधारावर भौमिक यांनी नगर परिषदेला सदर ठिकाणी बांधकाम करण्याची परवानगी मागितली. नगर परिषदेने एका पत्रात मोजमाप क्रमांक २३/१३ मध्ये हिस्से-वाटप पत्रानुसार उपहिस्सा कायम करून दाखविण्यात यावे, असे म्हटले. यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधी दिलेल्या प्रतीवर व्हाईटनर लावून ‘उपहिस्सा कायम केलेला आहे’ असे मत नोंदवून त्याची ‘क’ प्रतीसुद्धा उपलब्ध करून दिली. या आधारावर ३० आॅक्टोबर २०१४ रोजी चंदन भौमिक यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट पिटिशन क्रमांक ५९२७/१४ दाखल केला. यात त्यांनी सीमा कायम करण्यात आलेला नकाशा सादर केला. तो नकाशा बनावटी व खोडतोड करून बनविला आहे. एवढेच नव्हे तर न्यायालयासमोर बनावटी स्वाक्षरी करून सादर करण्यात आले. ही बाब पोलीस तपासात स्पष्ट झाली आहे.उल्लेखनिय म्हणजे सदर प्रकरणाची तपासणी करीत असलेले सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी न्यायालयाला सांगितले की, नगर परिषदेकडून सीमा नोंद करवून आणण्याची सूचना अर्जदाराला देण्यात आली होती. यानंतर बंद करण्यात आलेले मोजमाप क्रमांक २३/१३ च्या प्रकरणाला भूमी अभिलेख विभागाच्या रेकार्ड रूममधून शासकीय कर्मचाऱ्यानेच बाहेर काढले असावे, ही बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली. भूमी अभिलेख विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक टी.एल. गिडमणी यांनी बहेकार याला आपल्या कक्षात बोलावून भौमिक यांना दिलेली ‘क’ प्रती चुकीची आहे व त्यांना सुधारित प्रती देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती बहेकार यांनी आपल्या खुलाशात पोलीस विभागासमोर स्वीकार केली. या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे प्रभारी अधिकारी नरेश रंगारी, नजूल परिरक्षक भूमापक गुलाब निर्वाण, तत्कालीन उपअधीक्षक टी.एल. गिडमणी व चंदन भौमिक यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमानत देण्याचे नाकारले. रंगारी, निर्वाण व भौमिक यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमानतसाठी अर्ज केले असल्याची माहिती आहे. बहेकारला अटक करण्यात आली आहे व सध्या तो नगर भूमापक लिपिक पदावर कार्यरत आहे. वादग्रस्त मोजपाम दरम्यानसुद्धा ते याच पदावर कार्यरत होते व वादग्रस्त ‘क’ प्रतीवर त्यांची स्वाक्षरी आहे. बालाघाट मार्गावरील एका जमिनीच्या मोजमापात करण्यात आलेली ही गडबड भविष्यात नगर परिषदेच्या यात लिप्त काही अधिकाऱ्यांनाही उघड करेल, अशी चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)