शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

लाखांदूरचे सुपुत्र संतोष बेदरे अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:42 IST

भारतीय भूदलाचा जवान आणि लाखांदूरचा सुपुत्र संतोष बेदरे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी साश्रू नयनाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘संतोष बेदरे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिली तेव्हा प्रत्येकांच्या डोळ्यातून अश्रूधारा ओघळत होत्या.

ठळक मुद्देशासकीय इतमामात अंत्यसंस्कार : अरुणाचल प्रदेशात देशसेवा करताना मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भारतीय भूदलाचा जवान आणि लाखांदूरचा सुपुत्र संतोष बेदरे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी साश्रू नयनाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘संतोष बेदरे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिली तेव्हा प्रत्येकांच्या डोळ्यातून अश्रूधारा ओघळत होत्या.लाखांदूर प्लाँट येथील संतोष विठ्ठल बेदरे हा २००१ मध्ये भारतीय दलात सहभागी झाला होता. गत १७ वर्षांपासून तो बाँबे ११६ इंजिनियरिंग रेजीमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होता. अरुणाचल प्रदेशातील टिपागड येथील सीमेवर तो कार्यरत होता. देशात सर्वत्र २६ आॅगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना जवान संतोष बेदरे यांचा आजाराने दुर्देवी मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त लाखांदूर येथे कळताच गावावर शोककळा पसरली.अरुणाचल प्रदेशातून संतोषचे पार्थीव मंगळवारी १२ वाजता लाखांदूर येथे पोहचले. त्यावेळी अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरासमोर प्रचंड गर्दी झाली होती. बुधवारी सकाळी १० वाजता त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. चुलबंद नदीच्या तिरावर शासकीय इतमामात आणि हवेत फैरी झाडून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट नितीन पांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्चना मोरे, उषा मधुकर कुकडे, नगराध्यक्ष भारती दिवटे, तहसीलदार संतोष महल्ले, गटविकास अधिकारी देवीदास देवरे, उपसभापती शिवाजी देशकर, राजेश बांते, अविनाश ब्राम्हणकर, वामन बेदरे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रा.पी.एम. ठाकरे, नरेश खरकाटे, रामचंद्र राऊत, नूतन कांबळे, बालू चन्ने, पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी जवान संतोष बेदरे यांची पत्नी नंदा बेदरे, मुलगा भावेश बेदरे, मुलगी उर्वी बेदरे, आई पावबता बेदरे यांच्यासह बाँबे इंजिनियरिंगचे जवान, सैनिक बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.लाडक्या सुपुत्राला निरोप देताना अश्रू अनावरभारतीय सैन्य दलातील हवालदार संतोष बेदरे यांना अखेरचा निरोप देताना परिसरातील नागरिकांना अश्रू अनावर झाले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत गार्ड आॅफ आॅनर, शोक सलामी, बाजू शस्त्र आणि हवेत फैरी झाडण्यात आल्या. त्यावेळी वातावरण शोकाकूल झाले होते. पत्नी नंदा बेदरे आणि भावेश व उर्वी या दोन मुलांसह आई पारबताबाई यांचे अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावत होते. आपल्या लाडक्या सुपुत्राला श्रद्धांजली देण्यासाठी लाखांदूर येथील शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.