शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा पोलीस दलातील लेडी सिंगम योगीता जांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

योगीताचे अख्खे कुटूंब पोलीस दलात कार्यरत आहेत. वडील कपूरचंद जांगडे हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. तर भाऊही पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस परिवारात जन्म झालेल्या योगीतावर लहान पणापासूनच गुन्हेगारांविषयी प्रचंड चीड निर्माण झाली. महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्या महाविद्यालयीन जीवनात पेटून उठायच्या.

ठळक मुद्देनेताजी सुभाषचंद्र बोस शौर्य पुरस्कार ।आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीने सन्मान

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात कायद्याचे शस्त्र हाती घेऊन भल्या-भल्या गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या येथील योगीता जांगडे पोलीस दलातच नाही तर भंडारा जिल्ह्यात लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जातात. गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या आणि सर्वसामान्यांना मित्रत्वाची वागणूक देणाऱ्या या लेडी सिंघमच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही घेतली. मुंबई येथे झालेल्या एका सोहळ्यात त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस शौर्य पुरस्कार प्रदान केला. या पुरस्काराने पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.योगीताचे अख्खे कुटूंब पोलीस दलात कार्यरत आहेत. वडील कपूरचंद जांगडे हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. तर भाऊही पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस परिवारात जन्म झालेल्या योगीतावर लहान पणापासूनच गुन्हेगारांविषयी प्रचंड चीड निर्माण झाली. महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्या महाविद्यालयीन जीवनात पेटून उठायच्या. अशातच २००६ मध्ये त्यांची भंडारा जिल्हा पोलीस दलात निवड झाली. सुरुवातील वाहतूक शाखेत काम केले. योगीताचे राहणीमान लेडी सिंगम सारखे आहे. बॉयकट केस, डोळ्यावर काळा चष्मा आणि दुचाकीवर स्वार होऊन त्या एखाद्या गुन्हेगारासमोर पोहचतात तेव्हा त्याला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. खून, महिला अत्याचार, तस्करी, दरोडे यासारख्या गंभीर गुन्ह्याचा शोध लावण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.योगीता जांगडे यांना गुन्हे आणि गुन्हेगारांबाबत प्रचंड चीड आहे. त्यात महिला आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार सहनच होत नाही. कुठेही अशी घटना घडली की त्या जाऊन धडकतात. यासोबतच त्या सायबर सेल, मानवाधिकार, महिला व सामाजिक संघटनांच्या कार्यात नेहमी मार्गदर्शन करतात. महिला व मुलींनी आत्मनिर्भर व्हावे, आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड द्यावे आणि अन्यायाविरुद्ध दाद मागावी असे योगीता जांगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस