शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
7
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
8
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
9
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
10
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
11
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
12
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
13
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
14
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
15
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
16
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
17
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
18
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
19
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
20
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?

लाखनीतील पोलीस वसाहतीची दुरवस्था

By admin | Updated: May 19, 2017 00:51 IST

स्थानिक पोलीस स्टेशनसमोर पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. सदर वसाहतील पाच सदनिका व एक पोलीस निरीक्षकांचा बंगला भग्नावस्थेत आहे.

चार दशकांचा प्रवास : शासनाचे दुर्लक्ष, सोयीसुविधांचा वाणवा चंदन मोटघरे । लोकमत न्यूज नेटवर्क लाखनी : स्थानिक पोलीस स्टेशनसमोर पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. सदर वसाहतील पाच सदनिका व एक पोलीस निरीक्षकांचा बंगला भग्नावस्थेत आहे. गेल्या १० वर्षापासून वसाहतीत एकही पोलिसांचे कुटूंब वास्तव्याला नाही. शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पोलिसांना खासगी घरात रहावे लागते तर काही पोलीस अपडाऊन करत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील वर्षी दोन सदनिका दुरूस्त केल्यात परंतु त्याचा उपयोग झाला नसल्याने लाखो रूपयाचा चुराडा झाला आहे. लाखनी येथे १४ फेब्रुवारी १९७० ला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. तत्पूर्वी लाखनी येथे पोलीस चौकी होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बसस्थानकाजवळ गावाच्या बाहेर १९८३ ला नवीन इमारत तयार करण्यात आली. पोलीस निरीक्षक व पोलिसांसाठी १९८७ मध्ये सदनिका तयार करण्यात आल्यात. प्रारंभी पुर्र्ण सदनिकेत पोलिसांचे कुटूंब वास्तव्य करायचे व पोलीस सदैव जनतेच्या सेवेत तत्पर राहत होते. मागील १० वर्षाच्या कालावधीत वसाहतीकडे दुर्लक्ष झाले आहे. भिंतीला तडे गेले आहे. छत तुटलेले आहेत, भिंतीवर वृक्ष वेलींनी आक्रमण केली असल्याने सदनिका भग्नावस्थेत गेल्या आहेत. दोन सदनिकांची दुरूस्ती करण्यात आली परंतु परिसरात वाढलेले गवत, कचरा, अनावश्यक वृक्ष, स्वच्छतेचा अभाव यामुळे वसाहतीला वाईट दिवस आले. याठिकाणी मुलांना खेळण्याची साधने आहेत. विहीर आहे सर्वांची अवस्था बघण्यासारखी नाही. राज्य शासनाने पोलिसासाठी वसाहत व निवासस्थान तयार करून देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलली आहेत. लाखनीत २८ वर्षापुर्वी तयार झालेल्या सदनिका पोलिसांना वास्तव्य करण्यासारख्या राहिल्या नाहीत यामुळे जुन्या इमारती पाडून नवीन इमारत तयार करण्याची गरज आहे. मागील वर्षी डीपीडीसी मधून सदनिका दुरूस्तीसाठी ३० लक्ष रूपये मंजुर झाले होते. त्या निधीतून दोन सदनिका थातुरमातूर दुरूस्त्या करण्यात आल्यात. रंगरंगोटी करण्यात आली. त्याठिकाणी पोलिसांचे एकही कुटुंब वास्तव्याला नाही. लाखनी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक व ६५ पोलिसांची पद मंजुर आहेत. ६१ गाव व एक रिठी गावातील ९३ हजार लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी लाखनी पोलिसांची आहे. लाखनी पोलीस स्टेशनअंतर्गत लाखनी, मुरमाडी, सावरी, पोहरा, गुंथारा, पिंपळगाव सडक ही संवेदनशिल गाव येतात तर नक्षलग्रस्त संवेदनशिल गावामध्ये खुर्शिपार, उसगाव, चिखलाबोडी, सोनेखारी ही गावे येतात. जनतेच्या सेवेसाठी कोणतीही आपातग्रस्त परिस्थिती उद्भवली तर पोलिसांची गरज भासते. उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली यांच्या नियंत्रणाखाली येणारे १८ कंमोडोचे नक्षलविरोधी पथकाची मदत घ्यावी लागते.लाखनी पोलीस निवासस्थानांचा प्रश्न महत्वाचा असून पोलीस निरीक्षकांनी पोलीस सदनिकेच्या दुरूस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला आहे. वारंवार दुर्लक्ष झाले असल्याने ज्या इमारती दुरूस्ती करून वापरता येणे शक्य होत्या त्यांची आता दुर्दशा झाली आहे. पोलीस निरीक्षकांना निवासस्थान नाही पोलीस वसाहतीमध्ये पोलीस निरीक्षकासाठी बंगला तयार करण्यात आला तो वाईट अवस्थेत आहे भिती फुटलेल्या आहेत. परिसरात कचरा साचलेला आहे. साप विंचूकिटक आदिचे वास्तव्य वाढले आहे. यामुळे पोलीस निरीक्षकांना भाड्याच्या घरात वास्तव्य करावे लागते आहे. पोलीस वसाहतीची बकालस्थिती पोलीस वसाहत दोन एकर परिसरात विखुरलेली आहे. परिसरात पोलिसांची अनेक कुटूंब आनंदाने वास्तव्य करीत होती ते सर्व दिवस इतिहासजमा झाले आहेत. कर्मचारी भंडारा साकोली आदि शहरातून अपडाऊन करतात. लोकांच्या सेवेसाठी वेळेवर पोहचत नाही. पोलिसांना सदनिका उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.