शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

प्रशासकीय इमारतीत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:07 IST

येथील प्रशासकीय इमारतीत सोयीसुविधांचा अभाव असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विक्रीकर कर्मचारी संघटनेची सुविधांची मागणी

आॅनलाईन लोकमतभंडारा : येथील प्रशासकीय इमारतीत सोयीसुविधांचा अभाव असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोयीसुविधा पुरविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.निवेदनानुसार, नवीन प्रशासकीय इमारतीचे माहे मार्च-एप्रिल २०१६ च्या दरम्यान रंगकाम करण्यात आलेले आहे. या कामातंर्गत प्रशासकीय ईमारतीला दाराच्या बाजुला, समोरील भागास फक्त रंगकाम करण्यात आले आहे. इमारतीच्या खाली असलेला पोर्च, इमारतीमधील पोर्च व तसेच इमारतीचा बाहेरील सुटलेला काही भाग इत्यादीचे रंगकाम करण्यात आले ेनाही. तथापि इमारती मधील कक्ष क ३ व ४ ला आतून रंगकाम करण्यात आलेले आहे. परंतु कक्ष क्र. १ व २ चे अद्याप पर्यंत आतील रंगकाम करण्यात आलेले नाही.त्याच इमारतीमध्ये उपप्रादेशिक परविहन कार्यालय, सेतु केंद्र व जिल्हा उद्योग कार्यालय इत्यादी कार्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे येणे जाणे सुरू असते. त्यांना प्रसाधनगृह व शौचालय आदीची व्यवस्था नसल्याने परिसरात कुठेही या विधी उरकल्या जातात. त्यामुळ या परिसरात घाण पसरलेली आहे. चारही बाजुने दुर्गंध येत असतो. त्यामुळे इमारतीमधील कर्मचाऱ्यांना व परिसरातील इतर नागरिकांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रशासकीय इमारत परिसरात प्रसाधनगृह, शौचालयाची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सेतु कार्यालय व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी योजनाबद्ध पार्किंगची व्यवस्था या इमारतीमध्ये उपलबध होणे गरजेचे आहे. यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे कोषाध्यक्ष एस.बी. भोयर, विशाल तायडे, सहकोषाध्यक्ष, सुनिल थोटे, प्रशांत जडताळे, शिव साहेब उपस्थित होते.