लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आज आम्ही विवेक गमावून बसलो आहे. विदेशामध्ये संस्कृत भाषेचे गोडवे गायले जातात. परंतु आमच्यासाठी संस्कृत पठण चर्चेचा विषय ठरतो. संस्कृत चर्चेचा नाही तर देश कल्याणाचा विषय ठरावा. त्यासाठी स्वत:चा वाटा म्हणून प्रसार, प्रचारासाठी कार्य करावे. कार्यकर्ता संमेलन कार्यकर्त्यांना परिवर्तनाची उर्जा देणारे असते, असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख पं. नंदकुमार यांनी केले.संस्कृत भारती विदर्भ प्रांताचे कार्यकर्ता संमेलन भंडारा येथील सनीज स्प्रिंगडेल शाळेत २ ते ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटनाप्रसंगी ते अतिथी म्हणून बोलत होते. उद्घाटन आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्कृत भारतीचे प्रांत उपाध्यक्ष श्रीनिवास वर्णेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुनील मेंढे, अखिल भारतीय संपर्क प्रमुख नंदकुमार, प्रचार प्रमुख शिरीष भेडसगावकर, स्वागत समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र व्यवहारे उपस्थित होते.प्रास्ताविकातून प्रांतमंत्री विजयकुमार मेमन यांनी संस्कृत भारतीच्या विस्तारित होत असलेल्या कार्याची माहिती दिली. संस्कृत भारतीचे कार्य ईश्वरीय आहे. संस्कृतच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतूक असल्याचे स्पष्ट करीत हे संमेलन माझ्या मतदार संघात होत असल्याचा आनंद आहे असे आमदार रामचंद्र अवसरे म्हणाले. संस्कृती जीवंत ठेवणारी संस्कृत भाषा आहे. तिच्या संवर्धनाची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे सांगत संस्कृत भारतीच्या कार्यासाठी आपण सदैव सोबत असल्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे म्हणाले.स्वागत समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र व्यवहारे यांनी संस्कृत संमेलनाच्या निमित्ताने देवच अवतरल्याचे सांगत भंडारेकरांचे हे भाग्यच असल्याचे ते म्हणाले.नंदकुमार म्हणाले, प्रार्थनेला धर्माशी जोडणे कितपत योग्य आहे, हा विषय आपल्यासाठी नक्कीच चिंतेचा आहे. विदेशात संस्कृत भाषेला डोक्यावर घेतले गेले आणि आम्ही संस्कृत बोलणाºयांकडे आश्चर्याने बघतो. संस्कृत भाषा नाही, मार्गदर्शन आहे. आमच्या जीवंतपणी ही स्थिती आहे. त्यामुळे भारताला खरच स्वातंत्र प्राप्त झालंय का? हा प्रश्न पडतो. आज आम्ही विवेक गमावल्याने ही स्थिती आहे. परिस्थिती बदलण्यासाठी कार्यकर्ता हिंमत व धैर्यवान असावा. अशा कार्यकर्त्यांना घडविण्याचे काम कार्यकर्ता संमेलन करते.यावेळी संस्कृत क्षेत्रातील पुरस्कार मिळविलेल्या डॉ.शैलजा रानडे, वैशाली जोशी यांचा सत्कार करण्यात आला. संमेलनात विदर्भातून २०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. विविध सत्रामध्ये विविध विषयावर मंथन करण्यात आले. संचालन भंडारा नगरमंत्री प्रांजली पुराणिक यांनी, आभार प्रदर्शन प्रणिता भाकरे यांनी केले.
विवेक गमावल्याने संस्कृतीलाही विसरलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:12 IST
आज आम्ही विवेक गमावून बसलो आहे. विदेशामध्ये संस्कृत भाषेचे गोडवे गायले जातात. परंतु आमच्यासाठी संस्कृत पठण चर्चेचा विषय ठरतो. संस्कृत चर्चेचा नाही तर देश कल्याणाचा विषय ठरावा. त्यासाठी स्वत:चा वाटा म्हणून प्रसार, प्रचारासाठी कार्य करावे. कार्यकर्ता संमेलन कार्यकर्त्यांना परिवर्तनाची उर्जा देणारे असते, असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख पं. नंदकुमार यांनी केले. संस्कृत भारती विदर्भ प्रांताचे कार्यकर्ता संमेलन भंडारा येथील सनीज स्प्रिंगडेल शाळेत २ ते ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते.
विवेक गमावल्याने संस्कृतीलाही विसरलो
ठळक मुद्देपं. नंदकुमार : भंडारा येथे संस्कृत भारतीचे प्रांत संमेलन