शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत कुडकुडत्यांना द्या माणुसकीची ऊब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2015 00:30 IST

थंडीची चाहुल लागायला सुरूवात झाली. काही दिवसांनी बेडच्या आत, कपाटात कोंबलेले स्वेटर, शाल डोकवायला लागतील.

थंडीने जोर पकडला : तुमची थंडीही त्यांचे हसरे चेहरे बघून दूर पळेलनंदू परसावार भंडाराथंडीची चाहुल लागायला सुरूवात झाली. काही दिवसांनी बेडच्या आत, कपाटात कोंबलेले स्वेटर, शाल डोकवायला लागतील. त्यात जुन्या फॅशनचे जॅकेट, मफलर, कानटोप्या आकसलेले पण थंडीपासून वाचविणारी स्वेटर निघतील आणि कदाचित यावर्षी नवीन ट्रेंडप्रमाणे नवीन खरेदीही होईल. पण, तुमच्या जुन्या स्वेटरचे काय? फेकून द्यायचा विचार असेल तर यावर्षी एक गोष्ट नक्की करा. आपले जुने स्वेटर स्वच्छ धुवून आपल्या कार किंवा बाईकच्या डिक्कीत ठेवा. आॅफिस, कॉलेज किंवा बाहेर जाताना रस्त्यावर थंडीने कुडकुडणारे चिमुकले दिसले तर त्यांना हे जुने स्वेटर, शाल, मफलर, ब्लँकेट देऊन आपल्या वाट्याची माणुसकीची उब देऊन बघा! तुमची थंडी त्या निरागसांचे हसरे चेहरे बघून दूर पळेल.भंडारा जिल्ह्यात बालकामगांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. हे बालकामगार पोटासाठी दैनंदिनीप्रमाणे बोचऱ्या थंडीतही कुडकुडत काम करीत असतात. ही मुले कधी कचरा वेचताना दिसतात, कधी भंगार गोळा करताना तर कधी बुट पॉलिश करताना दिसून येतात. त्यांच्याकडे आपले लक्ष जात असले तरी त्यांना मदत करण्याची भावना आपल्यात निर्माण होत नाही. बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात तर रात्रभर कुडकुडत झोपणाऱ्यांची संख्या अधिक असते. कडाक्याच्या थंडीमुळे किंवा ऊबदार कपड्याअभावी दरवर्षी चार ते पाच जणांचा मृत्यू होत असल्याची नोंद जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आहे. त्यामुळे यावर्षीच्या हिवाळ्याच्या दिवसात थंडीमुळे कुणाचा नाहक जीव जावू नये. सामाजिक बांधिलकीतून आणि आपणही या समाजाचे घटक आहोत, या भावनेतून थंडीने कुडकुडणाऱ्यांना मदतीचा हाथ द्या, एवढेच.