शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

तरुण पिढी अडकली व्यसनाच्या विळख्यात

By admin | Updated: May 27, 2014 23:29 IST

आजची युवा पिढी देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य समजले जाते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या एकविसाव्या शतकात युवा पिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे. एवढेच नव्हे तर सध्या

बारव्हा : आजची युवा पिढी देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य समजले जाते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या एकविसाव्या शतकात युवा पिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे. एवढेच नव्हे तर सध्या अन्नापेक्षा व्यसन महाग झाले असूनही आजची भावी युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात गुरफटून गेली आहे.

दिवसातून किमान दोनवेळा जेवण घेतले जाते. सकाळी न्याहारी, दुपारी व रात्री जेवण अशी पद्धत आहे. शरीरासाठी आवश्यक कॅलरीज या जेवणातून प्राप्त होतात. त्यामुळे शुद्ध आणि शाकाहारी जेवणाकडे पूर्वीपासून भारतीयांचा कल राहीला आहे. मात्र हल्ली मानवाची जीवनशैलीच बदलली आहे. मानवाची दिनचर्याही पार बदलून गेली आहे. शरीराला आवश्यक असणार्‍या बाबींपेक्षा शरीराला अपायकारक ठरणार्‍या वस्तूंचे सेवन करण्याकडे कल वाढला आहे.

युवा पिढी तर पार भरकटली आहे. शरीराला अपायकारक असणार्‍या तंबाखु, सिगरेट आदी व्यसनाच्या विळख्यात युवक गुरफटले आहेत. दिवसातून किमान पाच ते दहा वेळा तंबाखू, खर्रा, गुटख्याचे सेवन केले जात आहे. सोबतच सिगारेटचा धूर वातावरणात सोडण्यातही युवक पुढे आहेत.

कमी दर्जाचा तंबाखू खर्रा किमान दहा रुपयाचा असून विशिष्ट तंबाखू खर्रा १५ ते ३0 रुपयाच्या घरात आहे. हा खर्रा दिवसातून पाचवेळा खातो म्हटले तरी किमान १00 ते १५0 रुपये दररोज लागतात. तंबाखूच्या एका पुडीची किंमत तीन रुपये आहे तर सिगारेटची किंमत ३ रुपयापासून ४0 रुपयापर्यंत आहे.

साधारणत: तीनही वस्तूचा खर्च १00 रुपयाच्यावर आहे. मात्र तरीही दिवसातून चार ते पाच सिगरेट फुकणारे, चार ते पाच खर्रा खाणारे सर्वत्र दिसतात. सर्वसामान्यांना दिवसातून किमान दोन र्खे लागतात. त्याचा खर्च ३0 रुपये येतो.

मात्र तरीही खर्रा खाण्यात कसूर केली जात नाही. सिगारेटच्या आहारी ही जादा प्रमाणात युवक वर्गच गेला आहे. शाळा, महाविद्यालयासमोर असलेल्या पानटपरी व हॉटेलच्या मागे युवक सिगारेटचे झुरके ओढताना दिसतात.

काही युवक चक्क वर्गात तासिका सुरू असताना तंबाखू घोटून आपली तलफ भागवितात. तंबाखू व सिगारेटच्या पाकिटावर जरी कॅन्सरग्रस्ताचा जबडा काढला असला तरी तंबाखूचे सेवन केले जात आहे. बाहेरगावी राहणार्‍या विद्यार्थ्यांना दोन वेळच्या जेवणाचा खर्च केवळ ३0 ते ३५ रुपये पडतो, मात्र खर्राचा खर्च ४0 रुपये पडतो.

अर्थात दोन वेळच्या जेवणापेक्षा खर्रा महाग पडतो, तरीही त्याचे सेवन सर्रास केले जाते. अन्नापेक्षा व्यसन महाग असूनही युवक त्याला मोठय़ा प्रमाणात बळी पडत आहेत. शरीरासाठी हानिकारक असलेल्या वस्तूचे सेवन करीत आहेत. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही. व्यसनाचा हा विळखा युवा पिढीसाठी अत्यंत घातक ठरत आहे.

(वार्ताहर)