मागणी : डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदनसाकोली : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे गावातील दलित कुटूंबातील जाधव परिवाराच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोलीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी साकोली मार्फत निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच साकोली येथे या हत्याकांडाचा तीव्र निषेधही करण्यात आला आहे.या निवेदनानुसार भाजपचे नवे सरकार स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा गावातील दलित कुटूंब संजय जाधव (४३) त्याची पत्नी जयश्री (४४) व मुलगा सुनिल (१९) यांची दि.२१ आॅक्टोबरला अमानुष व कार्यपद्धतीने हत्या करण्यात आली. घटनेला एवढे दिवस लोटूनही पोलीस आरोपीचा शोध घेण्यास असमर्थ ठरली आहे.सत्तारूढ विद्यमान सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय घटनेच्या तत्व निदर्शनानुसार धर्म, वर्ग, जात, लिंगाच्या आधारावर भेदभाव न करता सर्व धर्म समभाव तत्वावर शासन चालविण्याची हमी देत असले तरी दलितावर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. तालुक्यातील जनता अहमदनगर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाचा तीव्र निषेध नोंदवित आहे. डॉ. आंंबेडकर स्मारक समिती साकोली मार्फत निषेध निवेदन सादर करीत आहे. या दलित हत्याकांडाची त्वरीत चौकशी करून आरोपींना फाशी देण्याची न्यायीक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे, असे निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.निवेदन देताना अध्यक्ष घनशाम राऊत, उपाध्यक्ष अॅड. वामनराव खोब्रागडे, सचिव प्रभाकर बडोले, बी.एन. रामटेके, बी.बी. राऊत, शिलादेवी वासनिक, कल्पना सांगोडे, डी.जी. रंगारी, धीरज वाहने, अमित राऊत, चोपराम राऊत, सोनू राऊत, धरमदास नंदेश्वर, नामदेव गजभिये, मालती राऊत, मीना शामकुंवर, मनोज कोटांगले, नितीन मेश्राम, बाबुराव धारगावे, अचल मेश्राम, डॉ. नरेश राऊत, देविका गणवीर, अंजिरा नंदागवळी, भोला भालेकर, शैलेश रंगारी, नितीन राऊत, प्रविन कोटांगले, महेंद्र बडोले, विश्वास राऊत, शामराव हुमणे, अनुसया खांडेकर, दमयंता नंदेश्वर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ मारेकऱ्यांना फाशी द्या
By admin | Updated: November 6, 2014 22:51 IST