शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

खरिपाची पीकपेरणी २१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:14 PM

गत दिड महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील लागवडीला वेग आला आहे. या आठवड्यातील कृषी विभागाच्या नोंदीनुसार ल्ह्यिात २१.७० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. गतवर्षी या तारखेत केवळ पाच टक्के पेरण्या झाल्या होत्या.

ठळक मुद्देपाऊस समाधानकारक: शेतकरी सुखावला, धान १७.३७, कडधान्य ९१.७८ टक्के लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दिड महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील लागवडीला वेग आला आहे. या आठवड्यातील कृषी विभागाच्या नोंदीनुसार ल्ह्यिात २१.७० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. गतवर्षी या तारखेत केवळ पाच टक्के पेरण्या झाल्या होत्या.धान हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. धानपिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८० हजार ११९ हेक्टर आहे. यापैकी या आठवड्यात ३१ हजार २९२.३३ हेक्टरमध्ये धान लागवड करण्यात आली असून १७.३३ अशी टक्केवारी आहे. नर्सरी, आवत्या व रोवणी पध्दतीने धान लागवड केली जाते. यात नर्सरी पध्दतीने १६ हजार ८२५.५७ हेक्टर, आवत्या पध्दतीने ४ हजार ५०.५० हेक्टर तर रोवणी पध्दतीने २७ हजार २४१.८३ अशी एकूण ३१ हजार २९२.३३ हेक्टर क्षेत्रात धान लागवड झाली आहे.जिल्ह्यात २ लाख ३ हजार ७४२ हेक्टर असे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. आतापर्यत एकूण ४४ हजार २०८.०१ हेक्टर म्हणजेच २१.७० हेक्टर क्षेत्रात पत्यक्ष पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने २२दिड महिन्याच्या कालावधीत खरीप हंगामातील पेरण्या समाधानकारक असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात १ लाख ८० हजार ११९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३१ हजार २९२.३३ हेक्टर क्षेत्रात धान लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी १७.३७ एवढी आहे. यात भंडारा तालुक्यात १ हजार ५५.५०, मोहाडी ३ हजार ५२३.८३, तुमसर २१७, पवनी ६ हजार ४०७,२ साकोली ४ हजार ७०२, लाखनी ६ हजार ६६५, तर लाखांदूर तालुक्यात ८ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रात धान लागवड करण्यात आली आहे.कडधान्य लागवडीत भरजिल्ह्यात कडधान्याचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ११,२२७ हेक्टर आहे. यात बांध्यावर तुरीचे पीक, १० हजार २९७.४३ हेक्टरमध्ये लावण्यात आले. भंडारा १,५३९.४४ हेक्टर, मोहाडी १,७५.९९, तुमसर १,१६९, पवनी १,५९९, साकोली ८१०, लाखनी १,४९९.५०, लाखांदूर तालुक्यात २,३११ हेक्टर क्षेत्रात ही लागवड करण्यात आली.सरासरीपेक्षा अधिक पाऊसयावर्षी १ जून ते २१ जुलै या कालावधीत सरासरी ५२३.७ मिमी पाऊस झाला असून त्याची टक्केवारी १०६ आहे. मागील पावसाळ्यात याच तारखेपर्यत ३८१.६ मिमी पाऊस झाला होता. मात्र यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.तुमसर पिछाडीवरतुमसर तालुक्यात आजवर ५२७.२ मिमी पाऊस झाला. परंतु, लागवडीत हा तालुका माघारला आहे. २८ हजार ७५ हेक्टर लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र असून केवळ १ हजार ५४६ हेक्टरमध्ये प्रत्यक्षात पेरणी झाली. यात धान लागवड २१७ हेक्टरांत, कडधान्य लागवड १ हजार १६९, तेलबिया १२, हळद, अद्रक, मिरची व भाजीपाला १३८ हेक्टर अशी एकुण १ हजार ५४६ हेक्टर अशी लागवड झाली. चांगला पाऊस झालेला असताना या तालुक्यात खरीप पिकांच्या लागवडीत घट झाल्याचे दिसते. तर लाखांदूर तालुक्यात आतापर्यत सर्वाधिक लागवड झाली आहे. ३४ हजार ८०६ पैकी ११ हजार ४८६ हेक्टरांत खरीप पिकांची लागवड झाली आहे. तालुक्यात ५४१.३ मिमी असा ९८ टक्के पाऊस झाला.