चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : पाणीपुरवठा योजनेच्या सौरपंपाचे काम केल्यानंतर देयक न मिळाल्याने सौरपंप काढून नेण्यासाठी आलेल्या एका कंत्राटदाराला गावकऱ्यांनी रात्रभर नजरकैदेत ठेवले. दुसºया दिवशी समेट झाल्यानंतर कंत्राटदाराची सुटका झाली. हा अफलातून प्रकार लाखनी तालुक्यातील सोनमाळा येथे घडला.सोनमाळा ग्रामपंचायतीने सात महिन्यापूर्वी सौरउर्जापंप बसविण्यासाठी ई-निविदा काढली. त्यानुसार लाखनी येथील अंजली एंटरप्राईजेसला चार लाख ९९ हजार रुपयांचे काम मंजूर झाले. त्यानुसार कंत्राटदार एजंसीने गावात सौरउर्जापंप सुरु केले. गावकऱ्यांची पाण्याची सोय झाली. काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार देयक मागण्यासाठी ग्रामपंचायतीत गेला. त्यावर सरपंच व ग्रामसेवकाने धनादेश देण्यास टाळाटाळ केली. ग्रामपंचायतीने कामाला प्रशासकीय मंजुरी नसताना काम करवून घेतले होते. त्यामुळे देयके काढताना अडचण येत होती. कंत्राटदार पैसे मागून थकले. शेवटी सात महिन्यानंतर सौरउर्जा पंप काढून नेण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यासाठी शुक्रवारी एक ट्रॅक्टर घेऊन ते आपल्या कारने सोनमाळा येथे पोहचले. आता सौरपंप काढून नेल्यास गावात पाणीटंचाई निर्माण होईल. पाण्याचा प्रश्न चिघळेल. यामुळे गावकºयांनी सौरपंप काढण्यास विरोध करीत कंत्राटदाराला त्यांच्याच कारमध्ये नजरकैदेत ठेवले. दरम्यान शनिवारी दुपारी ३ वाजता सुटका केली.अखेर समेट झालागावकºयांनी कंत्राटदाराला नजरकैदेत ठेवल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाला मिळाली. शनिवारी दुपारी गटविकास अधिकारी धीरज पाटील, विस्तार अधिकारी चकोले, ग्रामपंचायत पदाधिकारी आदींची समन्वय बैठक घेण्यात आली. त्यात कंत्राटदार एजंसीला १ लाख ५० हजार रुपये तात्काळ देण्यात आले. पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला.
सौरपंप काढण्यासाठी आलेल्या कंत्राटदाराला ठेवले नजरकैदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:01 IST
पाणीपुरवठा योजनेच्या सौरपंपाचे काम केल्यानंतर देयक न मिळाल्याने सौरपंप काढून नेण्यासाठी आलेल्या एका कंत्राटदाराला गावकऱ्यांनी रात्रभर नजरकैदेत ठेवले. दुसºया दिवशी समेट झाल्यानंतर कंत्राटदाराची सुटका झाली. हा अफलातून प्रकार लाखनी तालुक्यातील सोनमाळा येथे घडला.
सौरपंप काढण्यासाठी आलेल्या कंत्राटदाराला ठेवले नजरकैदेत
ठळक मुद्देसोनमाळा येथील अफलातून प्रकार। रात्रभर ठेवले स्वत:च्या कारमध्येच कोंबून