कुरैशी यांचे प्रतिपादन : अनाथांसोबत भाजपचा स्थापना दिनभंडारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या थोरपुरूषांचे आदर्श आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलांनी वाटचाल करायला हवी. प्रत्येकाच्या अंगी कलागुण दडले. ते बाहेर काढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केले. भाजपा जिल्हा व्यापारी आघाडी व इंजिनियर सेल भंडारातर्फे भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात आला. शहरातील बापू बाल अनाथालयात आयोजित कार्यक्रमात कुरैशी बोलत होते. बालकांच्या उपस्थितीत केक कापून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मुकेश थानथराटे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, चंद्रप्रकाश दुरूगकर, मो.आबिद सिद्धीकी, नगरसेवक विकास मदनकर, प्रविण उदापुरे, शितल तिवारी, संजय मते, अरूण भेदे, महामंत्री प्रशांत खोब्रागडे, नितीन दुरगकर आदी उपस्थित होते.जिल्हा व्यापारी आघाडीचे सहसंयोजक नितीन दुरगकर यांनी बालकांना व्यापाराबाबत मूलभूत गोष्टींची माहिती दिली. यानंतर बालकांना खाऊचे व फळवाटप करण्यात आले. यावेळी इंजिनयर सेलचे सहसंयोजक आशिष गोंडाणे, शेलेंद्र श्रीवास्तव, राजू देसाई, नितीन कुथे, अमोल शहारे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
थोरपुरूषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवा
By admin | Updated: April 7, 2016 00:31 IST