लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : कर्नाटक राज्यातील हुबळी येथे विजेच्या धक्क्याने लाखनी तालुक्यातील कवडसी येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.सुशील एकनाथ मेश्राम (२२) असे मृताचे नाव आहे. तो रोजगाराच्या शोधात कर्नाटक राज्यात गेला होता. हुबळी येथे एका विद्युत कंपनीत कामाला होता. २ मार्च रोजी तो खांबावर चढला असता विजेचा जबर धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कवडसी येथे होताच गावावर शोककळा पसरली. दरम्यान मंगळवारी त्याचा मृतदेह कर्नाटकातून कवडसी येथे आणण्यात आला. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.
कवडसीचा तरुण कर्नाटकमध्ये ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:48 IST