शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

काेराेना मृत्यू! स्मशानात जागाही अपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचे तांडव सुरु असून दरराेज हजार ते १२०० व्यक्ती पाॅझिटिव्ह येत असून सरासरी १० ते पंधरा जणांचा काेराेनाने मृत्यू हाेत आहे. जिल्ह्यात कुठेही काेराेनाने मृत्यू झाला तरी अंत्यसंस्कार मात्र प्रशासनाने तयार केलेल्या भंडारा लगतच्या गिराेला येथील स्मशानभूमीतच केले जातात. जिल्ह्यात दुसरी कुठेही काेविड स्मशानभूमी नसल्याने संपूर्ण ताण यंत्रणेवर येताे. शासकीय रुग्णालयात काेराेनाने मृत्यू झाला की, मृतदेह शवागारात पाठविला जाताे.

ठळक मुद्देआक्राेश आणि राेष : दरराेज २० च्या वर मृतदेहांवर अंत्यसंस्कार

ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भयानक आणि भीषण शब्दही अपुरे पडतील अशी अवस्था भंडारा शहरालगतच्या गिराेला काेविड स्मशानभूमीत आहे. दरराेज २० च्या वर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला जात असतांना काही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षेत असतात. शवागारातील मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार व्हावे, यासाठी नातेवाईकांची तगमग रुग्णालय परिसरात दिसून येते. मात्र प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली असून नातेवाईकांच्या आक्राेशाने वातावरण भेसूर हाेते. भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचे तांडव सुरु असून दरराेज हजार ते १२०० व्यक्ती पाॅझिटिव्ह येत असून सरासरी १० ते पंधरा जणांचा काेराेनाने मृत्यू हाेत आहे. जिल्ह्यात कुठेही काेराेनाने मृत्यू झाला तरी अंत्यसंस्कार मात्र प्रशासनाने तयार केलेल्या भंडारा लगतच्या गिराेला येथील स्मशानभूमीतच केले जातात. जिल्ह्यात दुसरी कुठेही काेविड स्मशानभूमी नसल्याने संपूर्ण ताण यंत्रणेवर येताे. शासकीय रुग्णालयात काेराेनाने मृत्यू झाला की, मृतदेह शवागारात पाठविला जाताे. तेथे क्रमांक देऊन अंत्यसंस्कारासाठी तयारी केली जाते. अलीकडे स्मशानभूमीच्या क्षमतेपेक्षा अधिक मृत्यू हाेत असल्याने अनेक मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत दिसतात. मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार व्हावा अशी अपेक्षा प्रत्येक नातेवाईकांची असते. त्यातूनच मग आक्राेशासाेबत राेषही व्यक्त हाेताे. काेविड नियमानुसार मृतदेह शववाहिनीतून गिराेला येथे नेला जाताे. तेथे काेविड नियमानुसार अंत्यसंस्कार केला जाताे. गिराेला स्मशानभूमीत प्रशासनाने १४ ओटे अग्निसंस्कारासाठी तयार केले आहेत. मात्र दरराेज २० ते २५मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने ओटे कमी पडत आहे. त्यामुळे आता माेकळ्या मैदानात सरण रचून अंत्यसंस्कार केले जात आहे. धगधगत्या चिता पाहून अधिकारी, कर्मचारी भीषण वास्तव अनुभवत आहे.

दिवसाला दाेन ट्रक लाकडे गत दहा दिवसांपासून २० ते २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याने दाेन ट्रक लाकडे दरराेज लागत आहे. नगर परिषदेचे चार कर्मचारी सरण  रचण्याचे काम करतात. ट्रकमधून लाकूड काढून सरण रचणे आणि इतर विधी पार पाडण्याचे कामही त्यांनाच करावे लागते. पहिल्या दिवशी अंत्यसंस्कार झालेल्या मृतदेहाची रक्षा गाेळाही करावी लागते. संबंधित मृताचे नातेवाईक आले तर त्यांच्या सुपूर्द रक्षा केली जाते. परंतु कुणीच आले नाही तर या रक्षेची विल्हेवाट नगर परिषदेलाच लावावी लागते. रक्षा उचलल्यानंतर ओटे पाण्याने स्वच्छ केले जातात.नातेवाईकांना मुखदर्शन शवागारापासून ते स्मशानभूमीपर्यंत मृतदेह नेण्यासाठी नगर परिषदेचे चार कर्मचारी अहाेरात्र कार्यरत आहे. शवागारातून मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांना मुखदर्शन दिले जाते. त्यानंतर मृतदेहाला सॅनिटाईज करुन शववाहिनीद्वारे गिराेलाकडे नेले जाते. तेथे सर्व अंत्यसंस्काराचे विधी हे चाैघेच पार पाडतात. मात्र कुणी नातेवाईक मुखाग्नी देण्यासाठी तयार असेल तर पीपीई किट देऊन अंत्यसंस्कार पार पाडले जातात.स्मशानभूमीच्या कंपाऊंडला जाळी गिराेला येथील स्मशानभूमीबाबत परिसरातील गावातील नागरिकांच्या तक्रारी हाेत्या त्यावरुन प्रशासनाने संपूर्ण काेविड स्मशानभूमीच्या कंपाऊंडला आता तारांची जाळी लावली आहे. त्यामुळे काेणताही प्राणी आतमध्ये जाणार नाही याची दक्षता घेतली जाते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू