शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके! ध्येयवेडा अभियंता झोपडीतून देतो गोरगरीबांना शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:39 IST

भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील दावेझरी हे ३०० लोकसंख्येचे गाव. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला एक तरुण गावातील मुलांना शिक्षण देतो आहे.

ठळक मुद्देसमाजाची हेटाळणी आणि अडचणीचा सामना करीत ज्ञानार्जन

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सॉफ्टवेअर अभियांत्रिकीची पदवी घेवून तो गावात आला. गावातील शिक्षणाची अवस्था पाहून मन हेलावून गेले. गोरगरीब विद्यार्थ्यांचे कसे होणार, अशी चिंता त्याला सतावू लागली. मनाशी खूणगाठ बांधली आणि गावातच एक झोपडी बांधून गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देऊ लागला. सुरूवातीला गावकऱ्यांनी त्याला सुरूवातीला वेड्यात काढले. परंतु त्याने जिद्द सोडली नाही. आता त्याच्या मदतीला समाज धावून आला. एक एक शैक्षणिक साहित्य गोळा होवून तुमसर तालुक्यातील दावेझरी (आ) येथे ज्ञानयज्ञ सुरू झाला. या ध्येयवेड्या तरूणाचे नाव आहे, जय मोरे.भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील दावेझरी हे ३०० लोकसंख्येचे गाव. विकास काय असतो हे येथे पोहचलेच नाही. शिक्षणाचीही अशीच अवस्था. मात्र या गावातील एका ध्येवेड्या तरूणाने सॉफ्टवेअर अभियांत्रिकीची पदवी घेतली. महानगरात मोठ्या पगाराची नोकरी मिळणे शक्य होते. परंतु त्याने गाव गाठले. गावातील शिक्षणाची अवस्था पाहून मन कळवळून आले. शासन प्रशासन कुणीच लक्ष देत नसल्याने गावाचा विकास खुंटला. भावीपिढी शिक्षणापासून दूर जात असल्याचे लक्षात आले. अशा या गावातील मुलांसाठी काही तरी करायची खूणगाठ बांधली.जिद्द चिकाटीच्या जोरावर गावातील एका रिकामाच्या जागेवर झोपडी तयार केली. सिमेंटच्या पोत्यांचे आच्छादन घालून त्यात गावातील विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केली. गावातील गोरगरीबांची मुले तेथे शिक्षण शिकण्यासाठी येवू लागले. मात्र उच्च शिक्षित तरूण हा काय वेडेपणा करतो, असे मन सुरूवातीला गावकऱ्यांनी त्याची हेटाळणी केली. मात्र तो खचला नाही. पुन्हा जोमाने आपले ज्ञानसत्र सुरू केले.आता त्याने याठिकाणी स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेणे सुरू केले आहे. रात्रपाळीची शाळाही सुरू केली. शिक्षणाचे पवित्र काम करून तो या गावातील तरूणांना स्पर्धा परीक्षेत अव्वल आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याची ही जिद्द पाहून आता गावकरीही मदतीला धावून आले. एक एक करीत आता तेथे असंख्य पुस्तके जमा झाली. याच भरोशावर तो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करीत आहे. एका उच्च शिक्षित ध्येयवेडा तरूणामुळे गावातील विद्यार्थ्यात आता उत्साह संचारला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र