शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जंक फूड’ वाढवत आहे विविध आजार

By admin | Updated: January 5, 2016 00:38 IST

बैठे काम करणाऱ्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारण २५ ते ३० टक्के श्रमजीवी रस्ते, कॅफे व इतर बाह्य ठिकाणांवरील जंक फूडवर अवलंबून राहतात.

भंडारा : बैठे काम करणाऱ्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारण २५ ते ३० टक्के श्रमजीवी रस्ते, कॅफे व इतर बाह्य ठिकाणांवरील जंक फूडवर अवलंबून राहतात. परिणामी, हे लोक लठ्ठपणा या आजारापासून पीडित आहेत. त्यांच्यामध्ये विविध आजारांचा धोका वाढला आहे. आयर्नच्या कमी सेवनासह अपुऱ्या आहारामुळे अ‍ॅनेमिया व जीवनसत्त्वाची कमतरता असण्याची प्रकरणे वाढली आहेत. एका सर्वेक्षणात २४ टक्के पुरुष व १९ टक्के स्त्रियांमध्ये जीवनसत्त्व (ब) ची कमतरता आढळून आली आहे. हृदयविकारात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिकआईच्या गर्भामध्ये असल्यापासून हृदयाचे काम सुरू होते, ते अखेरचा श्वास घेईपर्यंत सुरूच असते. जन्मापासून अखेरपर्यंत अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या शरीराचा हा एकमेव महत्त्वपूर्ण असा अवयव आहे, त्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. असे असताना शहरातील २५.२१ टक्के पुरूष हृदयविकाराने पीडित आहेत. धक्कादायक म्हणजे, यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. २६.२६ टक्के महिला या आजाराने पीडित आहेत. २३ टक्के स्त्री-पुरुषांना डोळ्यांचा विकार लोहयुक्त आहाराच्या अभावामुळे २३.६९ टक्के पुरुष व २३.८८ टक्के स्त्रियांमध्ये डोळ्यांविषयक समस्या असल्याचे आढळून आले. वेळेचा अभाव, १० तासांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत लॅपटॉप्स व संगणकांचा वापर. रात्री दोन-तीन तास मोबाईलचा वापर यामुळे मुख्यत: २० ते २५ वर्षे वयोगटातील युवा पिढीच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचे आढळून आले. लोहयुक्त आहाराच्या कमी सेवनामुळे १९.३६ टक्के स्त्रिया अ‍ॅनेमियापासून पीडित आहेत. २८ ते ३५ वर्षीय स्त्रियांमध्ये वाढतोय लठ्ठपणाशहरात लठ्ठपणाच्या केसेसमध्ये दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ होत आहे. तणाव, जंक व तेलकट फूडचे अधिक प्रमाणात सेवन यासोबतच आठवड्यामधून दोन किंवा तीनदा जेवणासाठी बाहेर जाणे, या कारणांमुळे मुख्यत: २८ ते ३५ वर्षे वयोगटातील स्त्रियांना लठ्ठपणाचा धोका असल्याचे आढळून आले आहे. जीवनसत्त्वाचे कमी सेवन व चरबीयुक्त पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन अशा खाण्याच्या सवयींमुळे २५ ते ३० टक्के युवा पिढींच्या जीवनात आजाराचा धोका वाढला आहे. ३१.९ टक्के पुरुष मधुमेहीभारतामध्ये जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रूग्ण आढळतात आणि मृत्यूच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वाधिक कारणांपैकी एक आहे. मधुमेह ही व्याधी केवळ रक्तातील वाढलेली शर्करा या स्वरूपात नसून तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधुमेह होण्याच्या कारणांमध्ये चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव ही दोन महत्त्वाची करणे आहेत. शहरात ३१.०९ टक्के पुरूष तर २६.२३ टक्के महिला या व्याधीने पीडित असल्याचे स्पष्ट झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)