शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शंभरी गाठलेल्या रेल्वे पुलावरून रेल्वे गाड्यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:47 IST

मुंबईत अंधेरी व एलफिस्टन रेल्वे स्थानकवरील जुना पूल पावसाळ्यात कोसळला ही घटना ताजी आहे. मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर माडगी (दे) शिवारात वैनगंगा नदीवर शंभरी गाठलेला ब्रिटीशकालीन पूल आहे.

ठळक मुद्देमाडगी शिवारातील पूल : स्ट्रक्चरल आॅडिट झाला, मुंबई पूल अपघातानंतर रेल्वे सतर्क

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मुंबईत अंधेरी व एलफिस्टन रेल्वे स्थानकवरील जुना पूल पावसाळ्यात कोसळला ही घटना ताजी आहे. मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर माडगी (दे) शिवारात वैनगंगा नदीवर शंभरी गाठलेला ब्रिटीशकालीन पूल आहे. त्या पूलाच्या समांतर डाऊन रेल्वे मार्गावर भारतीयांनी बांधकाम केलेल्या पुलाला सुध्दा ६० ते ६५ वर्षे झाली आहेत. सदर दोन्ही पुलांचे स्ट्रक्टचरल आॅडीट झाल्याची माहिती आहे, पंरतु पूल परिसरातील रेती उपस्यामुळे तथा पुलाच्या आयुष्याच्या पूर्वाधात सतर्कतेची गरज आहे.माडगी (दे) शिवारात वैनगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. ब्रिटीशांनी रेल्वे वाहतूकीकरिता दगडी रेल्वेपुलाचे बांधकाम सुमारे शंभर वर्षापुर्वी केले होते. त्यावेळी बंगाल - नागपूर अशी सेवा सुरु होती. सन १९०० मध्ये रेल्वेचे जाळे हावडापर्यंत वाढविण्यात आले होते. स्थापत्य केलेल्या हा पूल उत्कृष्ठ नमूना म्हणून ब्रिटीशांनी नोंद केली आहे. सदर पूल तयार करतांनी इंग्रजांच्या स्थापत्य कलेची येथे कसोटी लागली होती. दगड, चुना व चुनखडीच्या मिश्रनाने हा पूल तयार केला आहे. या पूलाखालून अनेक पूर वाहून गेले हे विशेष.मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर सध्या २४ तासात १८० ते २०० प्रवाशी व मालगाड्या धावतात. दररोज हा क्रम सुरु आहे. त्यामुळे पूलाच्या आयुष्यावर शंका घेतली जाणे ही क्रमप्राप्त ठरते. पूलाचे आयुष्य ब्रिटीशांनी सव्वाशे वर्षे ठरविल्याची माहिती अधिकारी खासगीत सांगतात. पूलाच्या नोदंी रेल्वे मुख्यालयात असल्याची माहिती आहे. ब्रिटीशकालीन पूलाला समांतर भारतीयांनी दुसरा पुल ६० ते ६५ वर्षापुर्वी तयार केल्या आहे.दोन्ही पूलांची देखभाल व डागडूजी नियमित रेल्वे विभाग करीत आहे. जुना पूल अपघातानंतर या पुलाची चर्चा केली जाते. प्रवाशी व मालगाड्या पूलावरुन पावसाळ्यात जातांनी त्यांचा वेग खूप कमी केलाजातो. रेल्व ेती खबरदारी होते. रेल्वेचे अभियंते येथे पुलाची पाहणी करुन नेहमीच जातात. दोन्ही पुलाजवळ रेतीचा भराव नाही. केवळ दगड दिसतात. पूलावरुन गाड्या जातांनी पुलात मोठे कंपन होते. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरवर्षी पावसाळ्यात ऐन पुरात रेल्वेगाड्या धावतांनी सर्वांच्या मनात मात्र धडकी भरते हे विशेष. ऐरवी धडधड करीत जाणाºया रेल्वेगाड्या पावसाळ्यात मात्र संथगतीने पुलावरुन जातात.रेल्वेने पुलाचा स्ट्रक्चरल आॅडीट जरी केला असला तरी रेल्वेगाडयांची संख्या पाहता तज्ञ स्थापत्या अभियंत्याकडून तपासण्ीा करणे गरजेचे आहे. स्ट्रक्चरल आॅडीट तर मुंबई येथील पुलाचा सुध्दा झाला होता. केवळ पाऊसामुळे तो कोसळला. माडगी येथील पुल तर शंभर वर्षापासून नदीच्या पाण्यात उभा आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ.पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते तुमसर.धडधड करीत जाणाऱ्या रेल्वेगाड्या पावसाळ्यात अगदी संथगतीने पुढे सरकतात. नदीचा प्रवाह येथे जोरात असतो. पाणी पूलाच्या खांबावर आदळतो. खांबाजवळ रेती नाही. खांब सताड उघडे पडले ओत. पुलाची केवळ वरुन डागडुजी केली जाते. १०० वर्षाच्या जुन्या पूलाकडे विशेष लक्ष रेल्वेने द्यावे- विपील कुंभारे, माडगी ,