शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जनधन योजनेला तळागाळात पोहोचविणे आवश्यक

By admin | Updated: October 9, 2015 01:12 IST

प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये जिल्हयात आतापर्यंत ३ लाख ९५,८१७ बँक खाते उघडण्यात आले आहे. या योजनेला ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत आता ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ : लाभ घेण्याचे नाना पटोले यांचे आवाहनभंडारा : प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये जिल्हयात आतापर्यंत ३ लाख ९५,८१७ बँक खाते उघडण्यात आले आहे. या योजनेला ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत आता ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. हे खाते झिरो बॅलन्सवर उघडण्यात येत असले तरी या खात्यातून खातेदाराला ५ हजार रुपयापर्यंत रक्कम काढता येते. या योजनेतील खातेधारकांला २ लाख रुपयापर्यंतचे विमा सुरक्षा उपलब्ध होते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून बँकेत खाते उघडावे, असे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरज कुमार, नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी संजय पाठक उपस्थित होते. जनधन योजनेतील खातेधारकाने ६ महिनेपर्यंत जर बँक व्यवहार केले नाही, तर ते खाते बंद होते. त्यामुळे खातेधारकांनी या खात्यामार्फत सतत बँक व्यवहार करणे आवश्यक आहे. तसेच ५ हजार रुपयापर्यंत कधीही बँक खात्यातून रक्कम काढता येते. मात्र काढलेली रक्कम पुन्हा बँक खात्यात जमा करणे आवश्यक असल्याची माहिती खादार नाना पटोले यांनी दिली. असंघटीत क्षेत्रातील लोकांना स्वयंरोजगार करण्यासाठी आणि अस्तित्वातील रोजगार वाढविण्यासाठी कर्ज मिळणे सोयीस्कर व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेअंतर्गत सहज कर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली आहे. योजनेमध्ये ५० हजार ते ५ लाख रुपयापर्यंत तर तरुण योजनेत ५० हजार ते १० लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी १० टक्के व्याज दर आकारण्यात येतो, असेही नाना पटोले म्हणाले. मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्हयात १५६२ लोकांना कर्ज उपलब्ध करुन दिले असून ४ कोटी ९८ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमानतदाराची आवश्यकता नाही. मात्र, पूर्वी एखाद्या बँकेचे कर्ज थकीत असणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळणार नाही. कर्ज परत करण्याची मुदत ५ वर्ष आहे. प्रधानमंत्री विमा योजने अंतर्गत ( १२ रुपये ) जिल्हयात आतापर्यंत १ लाख ६ हजार ७९ लोकांनी विमा काढला असून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा (३३० रुपये) योजनेचा लाभ आतापर्यंत १ लाख १० हजार ६५० लोकांनी घेतला आहे. त्याचबरोबर अटल पेंशन योजनेमध्ये ७१६ लाभधारक आहेत.या सर्व योजनांच्या संदर्भात काही व्यक्ती व संस्थांकडून जनतेची दिशाभूल करणारे पत्रक वाटले जात आहेत. मात्र, जनतेने या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी न पडता नागरिकांनी थेट बँकेशी संपर्क करावा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)