शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक पोळ्यात उसळला जनसागर

By admin | Updated: September 2, 2016 00:36 IST

परसोडी- जवाहरनगर येथे १८५८ पासून ऐतिहासीक पोळा भरतो. याहिवर्षी मोठ्या उत्साहात पोळा साजरा करण्यात आला.

१५८ वर्षांची परंपरा : परसोडी-जवाहरनगर येथील पोळा, विदेशी पर्यटकांची हजेरीजवाहरनगर : परसोडी- जवाहरनगर येथे १८५८ पासून ऐतिहासीक पोळा भरतो. याहिवर्षी मोठ्या उत्साहात पोळा साजरा करण्यात आला. उत्कृष्ट बैलजोडी सजावटीकरिता पुरस्कार देण्यात आले.परसोडीवासीयांनी जपलेली १५८ भुषणावह वर्षाची परंपरा पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. पोळा पंचकमेटी, ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पोळ्याचे आयोजन करण्यात आले. बालगोपालांपासून तर सगळ्यांची गर्दी होती. यावर्षी ५२ जोडींनी पोळ्यात हजेरी लावली. बैलजोडीला पुरस्कार मिळेल या आशेपोटी बैलाची सजावट कायम टिकवून ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे आयोजनकर्त्यांनी आंब्याच्या पानांचे तोरणही बैलजोड्यासाठी अपुरे पडले. झडती म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली. यात राजकपूर राऊत, मनसाराम वंजारी, डोमाजी सुखदेवे, खुशाल फंदे यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर होते. यावेळी उपसरपंच दर्शन फंदे, देवचंद सेलोकर, तंटामुक्ती अध्यक्ष होमदेव चकोले, मोतीलाल येळणे, ग्रा.पं. सदस्य, तिजा बावनकुळे, ओमगणेश थापा, कुंदा हटवार, बंडू हटवार, कल्पना मोटघरे, लिलाधर चोपकर, माजी पोलीस पाटील काशीनाथ वंजारी, पृथ्वीराज शेंडे, भाऊराव वैरागडे, भागवत घोल्लर, ताराचंद गजभिये, माजी सभापती राजकपूर राऊत, रघुपती फंदे, कुलदीप कावळे, पे्रमसागर वैरागडे, शाम हटवार उपस्थित होते. पाहुण्याच्या हस्ते बैलजोड्याचे निरीक्षण करण्यात आले. उत्कृष्ट बैल सजावटीकरीता उपस्थितांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यात प्रविण बडवाईक, किसन बावनकुळे, विलास वंजारी, रामेश्वर डोरले, श्रावण हटवार, लोकेश हटवार, संतोष हटवार, अनुप हटवार, दिनेश कडबे, मच्छींद्र फंदे, दिलीप दादुरवाडे, अजय हटवार, लवा गभणे, भगवान वंजारी, अंबादास बंसोड यांचा समावेश आहे. यावर्षी प्रथम पारितोषीक सरपंच पंकज सुखदेवे यांच्याकडून गोदरेज सोकेस देण्यात आले. प्रास्ताविक मारोतराव हटवार यांनी केले. संचालन चेतन चोपकर यांनी केले. आभार माजी समाजकल्याण सभापती राजकपूर राऊत यांनी मानले. (वार्ताहर)लवारीतही उत्साहलवारी : साकोली तालुक्यातील लवारी येथे बैलपोळा बक्षीस देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा पोळा देवस्थानपंच कमेटी व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरा करण्यात आला. गावातील सर्व जोड्या एकत्र येवून त्या जोड्याचे पंच कमिटीच्या वतीने निरीक्षक करण्यात आले. उत्कृष्ठ सजावट असलेल्या जोडीला बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी गावकरी झडत्या म्हणून पोळ्यात भर घातली. अशा प्रकारे लवारी येथील बैलपोळा पार पडला. या कार्यक्रमाला पोलीस पाटील विनोद किरणापुरे, देवस्थान अध्यक्ष गजानन किरणापुरे, उपाध्यक्ष पुरूषोत्तम कापगते, सचिव दामोधर गोटेफोडे, तंमुस अध्यक्ष यादोराव मेश्राम, उपसरपंच अनिता किरणापुरे, सुरेश नगरीकर, चंदू कापगते, श्रीराम महाजन, आसाराम किरणापुरे, लेसमन लांजेवार, मोहन समरीत, सेवक निखारे, दामु कुलसिंगे यांच्यासह ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)