शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अबब! भंडारा जिल्ह्यात दसरा उत्सवात उसळला जनसागर; प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 21:23 IST

Bhandara News प्राचीन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भाची काशी पवनी येथील दसरा उत्सवात प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.

अशोक पारधीभंडारा : प्राचीन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भाची काशी पवनी येथील दसरा उत्सवात प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. चंडिकामाता मंदिराच्या परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. विविध साहसी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. रावणदहन होईपर्यंत गर्दी कायम होती. जणू कोरोना आता हद्दपार झाल्याचा समज नागरिकांनी करून घेतल्याचे गर्दीवरून दिसत होते.पवनी येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून माता चंडिका मंदिराच्या परिसरात दसरा साजरा केला जातो. गतवर्षी कोरोनाचे संकट असल्याने पहिल्यांदाच दसरा गर्दीशिवाय साजरा झाला होता. यावर्षी गर्दी न करता उत्सव साजरा करण्याची सूचना प्रशासनाने केली होती; पण नागरिकांनी न जुमानता नगरातील चौका-चौकात व दसरा उत्सवाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली. उत्सव समारंभापासून दीड वर्ष दूर राहिलेले नागरिक दसरा उत्सवाचे निमित्त साधून घराबाहेर पडले. पवनी येथील दस?्याला स्थानिक आखाड्यामुळे विशेष महत्त्व आहे. शस्त्रपूजा करून व युद्धकौशल्याचे प्रदर्शन करीत आखाड्याच्या वस्तादांनी नगरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढली. माता चंडिका मंदिर परिसरात उत्सव स्थळी आखाडे दाखल झाले. उसळलेली गर्दी पाहून आखाड्यातील वस्ताद व त्यांचे शिष्य यांनी दांडपट्टा, लाठीकाठी, भाला व तलवारबाजी, तसेच विविध साहसी प्रात्यक्षिक दाखवून नागरिकांकडून प्रतिसाद मिळविला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सर्व प्रयोग थांबले; पण रावणदहन होईपर्यंत नागरिकांनी जागा सोडली नाही.गामा वस्ताद जुना आखाडा, गामा वस्ताद नवीन आखाडा, छत्रपती शिवाजी महाराज जुना आखाडा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन आखाडा, सार्वजनिक चंडिका आखाडा, जय बजरंग आखाडा आदी उत्सवात सहभागी झाले होते. चंडिका मंदिर देवस्थान कमिटी, पोलीस प्रशासन, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय संच, आखाड्यात वस्ताद व नगरातील विविध संघटनांचे स्वयंसेवक शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी प्रयत्न करीत होते. यावेळी परंपरागत युद्धकौशल्याला फाटा देऊन युवा पिढी हुल्लड बाजी करताना दिसल्याने भाविकांत नाराजीचा सूर पाहायला मिळाला. मात्र, कोरोनाच्या सावटात झालेल्या या गदीर्ने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

टॅग्स :Dasaraदसरा