भंडारा : येथील कृष्ण मंदिर वाॅर्डात असलेल्या श्रीकृष्ण मंदिर देवस्थानात जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी नागेश तईकर यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण व राधा यांच्या मूर्तींना अभिषेक करून पूजा-अर्चना करण्यात आली. रात्री बारा वाजता महाआरती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सोनकुसरे महाराज यांच्या हस्ते गोपालकाला व दहीहंडी कार्यक्रम पार पडला. यावेळी भजन मंडळीने उत्कृष्ट भजन सादर केले. अमरदीप निनावे यांच्याकडून महाप्रसाद व गोपालकाल्याचे वितरण करण्यात आले. यावेळी बहुतांश भाविकांनी गोपालकाल्याचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी राजकुमार निनावे, चंदू लिमजे, राजू निनावे, आशिष महाकाळकर, मोहन बारापात्रे, प्रमोद लिमजे, डॉ. योगेश जीभकाटे, सुनंदा तईकर, मालती लिमजे, तसेच श्रीकृष्ण मंदिर देवस्थान पंचकमिटीचे पदाधिकारी व भाविकांनी सहकार्य केले.
श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमी उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST