शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

न्याय्य हक्कांसाठी जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:30 IST

अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी व बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शनिवारी आयटकच्या पुढाकाराने जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

ठळक मुद्देआयटकचा पुढाकार : अंगणवाडी, पोषण आहार कर्मचाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी व बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शनिवारी आयटकच्या पुढाकाराने जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली.विशेष म्हणजे भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत अपमानास्पद बोलल्याबाबद आयटकने जोडे मारो आंदोलनही यावेळी केले. केंद्र शासनाने योजना कामगारांसाठी या अंतर्गत ना.अरुण जेटली यांनी १७ आॅगस्ट २०१६ रोजी अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार, आशा वर्कर यांना प्रतीदिन ३५० रुपये वेतन व गटप्रवर्तक ४५० रुपये, ईपीएफ व आरोग्य सुविधा लागू करण्याची घोषणा केली होती. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही शासनादेश निघालेला नाही. त्यासंदर्भात आयटक प्रणित अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनीयन, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनीयन जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने शनिवारी मोर्चा काढण्यात आला. तसेच जवाब दो व जेलभरो आंदोलन करण्यात आले. तसेच महिला विषयी अपशब्द बोलणाºया भाजप आमदार राम कदम यांना अटक करा अशी मागणीही करण्यात आली. यावेळी अंगणवाडी कर्मचारी युनीयनचे कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांच्यासह शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, सविता लुटे, आशिषा मेश्राम, भाग्यश्री उरकुडे, सदानंद इलमे, गजानन लाडसे, गजानन पाचे, किसनाताई भानारकर, अलका बोरकर, मंगल गजभिये, रिता लोखंडे, मंगला रंगारी आदींच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयाना देण्यात आले. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आर्थिक निधी वाढवून अंगणवाड्यांना वाचविण्यात यावे तसेच २५ पेक्षा कमी मुले असणाºया अंगणवाड्यात दुसºया अंगणवाडीत समायोजित करण्यात यावे हा आदेश रद्द करावा. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सोयी सुविधा द्याव्यात. तोपर्यंत त्यांच्या मानधनात भरघोस वाढ करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आशा व गटप्रवर्तक यांच्या वेतनाबाबत व पात्रतेप्रमाणे शासनसेवेत रिक्त पदांवर सामावून घ्यावे, शालेय पोषण आहार कर्मचाºयांचे चार महिन्यांपासून थकीत असलेले मानधन देण्यात यावे या मागण्यांचा समावेश आहे.बांधकाम कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या २८ योजनांचा लाभ खºया बांधकाम कामगारांना देण्यात यावा, कामगारांना घरबांधणीसाठी २ लाख रुपये देण्यात यावे, महात्मा फुले जनआरोग्य विमा योजनेची अंमलबजावणी सुरु करावी आदी मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आंदोलनासाठी गौतमी मंडपे, वामनराव चांदेवार, कुंदा भदाडे, सुनंदा बडवाईक, वंदना बघेले, छाया क्षीरसागर, विजया काळे, अनिता घोडीचोर, लिलावती बडोले, मंगला गभणे आदींनी सहकार्य केले.