शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ शासन निर्णय ठरला एसटी कर्मचाऱ्यांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

राज्य परिवहन महामंडळातर्फे वर्ष २००५ मध्ये कर्मचारी हिताचा काढण्यात आलेला शासन निर्णय २००७ मध्ये रद्द करण्यात आला.

जीआर रद्द करण्याची मागणी : अनेक कर्मचाऱ्यांवर ओढवले उपासमारीचे संकट सिराज शेख मोहाडीराज्य परिवहन महामंडळातर्फे वर्ष २००५ मध्ये कर्मचारी हिताचा काढण्यात आलेला शासन निर्णय २००७ मध्ये रद्द करण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या शासन निर्णयातील जाचक अटीमुळे एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फ होण्याची पाळी अनेकावर आली. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या ३ डिसेंबर २००५ च्या शासन निर्णयानुसार मार्ग तपासणीमध्ये गैरवर्तणुकीचे अपराध करताना वाहकास पकडल्यास सदर वाहक पहिल्यांदा पकडला गेल्यास त्याला निलंबित अथवा बडतर्फ न करता त्याच्या कबुलीजवाबाप्रमाणे जितक्या किमतीच्या तिकीटाचा अपहार झाला असेल. त्याच्या ५० पट किंवा किमान पाच हजार रुपये इतकी नुकसान भरपाई वसुल करावी. दुसऱ्या वेळेस याच अपराधाची पुनरावृत्ती झाल्यास त्या रकमेच्या ७५ पट किंवा किमान १० हजार इतकी नुकसान भरपाई वसुल करावी, असे महामंडळाच्या संचालक मंडळाने ठराव करुन हे परिपत्रक काढले होते. यामागील उद्देश असा की महामंडळातील कर्मचाऱ्यांची कमतरता, प्रलंबित अपराध प्रकरणांची भरमसाठ संख्या, त्यामुळे एकूण चलनीय कामगिरीवर होणारा परिणाम, न्यायालयीन प्रकरणात होणारा वाद, त्यावरील खर्च तसेच कामाविना न्यायालयीन निकालानुसार मागील वेतनासह करावी लागणारी पुर्नस्थापना आदी बाबी लक्षात घेऊन वाहक व मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईत बदल करणारे परिपत्रक काढण्यात आले होते ते दोन वर्षापर्यंत लागु होते. मात्र १६ जानेवारी २००७ च्या नविन शासन निर्णयाप्रमाणे मागील सर्व शासन निर्णय रद्द करुन पुन्हा जुनीच प्रणाली अंमलात आणण्यात आली आहे.१६ जानेवारी २००७ रोजी काढण्यात आलेला तो शासन निर्णय वाहक व मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांच्या मुळावर घाव घालणारा आहे. अनेकदा प्रवासी गर्दीमध्ये तिकीट काढण्यास चुकतात व तपासणी आल्यावर वाहकाला बडतर्फ करण्यात येते. ही पध्दत या विभागात चुकीची असून अन्य विभागाप्रमाणे त्यांनाही सवलत देण्यात यावी, अशी मागणी वाहकांकडून होत आहे. २००७ चा शासन निर्णय रद्द केल्यास अनेक परिवारातील सदस्यांना आधार मिळेल. त्यांचे हलाखीचे जीवनमान बदलु शकण्यासाठी मदत होईल, यासाठी लोकप्रतिनिधींच आता पुढाकार घेण्याची गरज आहे.