शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:10 IST

जिल्हयातील धारगाव उपसा सिंचन प्रकल्पातील पहिल्या टप्याचे काम गतिमान करण्यासाठी सात महिन्यापुर्वी शासनाने निर्देश दिले होते. मात्र या कामांना गती नसल्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या लक्षात आले. यात जलसंपदा, मदत पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, गोसेखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांची बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा होणार जलयुक्त : पालकमंत्र्यांनी दिले सर्वेक्षणाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हयातील धारगाव उपसा सिंचन प्रकल्पातील पहिल्या टप्याचे काम गतिमान करण्यासाठी सात महिन्यापुर्वी शासनाने निर्देश दिले होते. मात्र या कामांना गती नसल्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या लक्षात आले. यात जलसंपदा, मदत पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, गोसेखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी तात्काळ सर्वेक्षण करुन १५ दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकल्पामुळे भंडारा जिल्हयातील जवळपास १२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना धारगांव उपसा सिंचन टप्पा-१ व टप्पा-२ याबद्दल सुध्दा युध्द पातळीवर कार्यवाही करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. शासनाकडे प्रलंबित बाबींवर तातडीने निर्णय घेवून प्रकल्पांचे कामकाज सुरु होईल यादृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ.फुके यांनी दिले.शेकडो गावांना फायदा होणार आहेत. यामध्ये जवळपास १ लाख पेक्षा जास्त शेतकरी आपली शेती ओलीत करुन भरघोस उत्पन्न घेवू शकेल. तसेच भंडारा जिल्हयाची ओळख ही जलयुक्त जिल्हा म्हणून ओळखले जाणार. या प्रकल्पाला पालकमंत्री यांनी गती दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकल्पांसोबतच गोसेखुर्द धरण प्रकल्पावरील हत्तीडोई उपसा सिंचन उपसा सिंचन प्रकल्पास मंजुर प्रदान करण्यासंदर्भात येणाºया अडचणी दूर करुन येत्या १५ दिवसात कारवाई करण्याबाबत सुध्दा स्पष्ट सुचना देण्यात आल्या. या बैठकीमध्ये आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, कार्यकारी संचालक सुर्वे, अवर सचिव, महसूल व वन विभाग, कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द पुनर्वसन प्रकल्प, शाखा अभियंता यांच्यासह जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प