अधिकाऱ्यांचा आशिर्वाद : नियमबाह्य कामांना प्राधान्यभंडारा : राज्य शासन प्रगत शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांची प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असे असताना भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात येत आहे. याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असून नियमबाह्य कामांना प्राधान्य दिले जात आहे.विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती असमाधानकारक असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत होती. यावर राज्य शासन व शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक धोरणाचा अवलंब करून विद्यार्थ्यांना सर्वसमावेत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्नही राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण उच्च दर्जाचे मिळावे यासाठी शासन वर्षाला कोट्यवधी रूपये खर्च करीत असताना या सर्व बाबीला जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) हरताळ फासत असल्याच्या काही बाबी समोर आल्या आहेत.शिक्षण विभागाच्यावतीने यावर्षी डावी-कडवी योजनेतून जिल्ह्यातील काही शाळांचे वर्गखोली बांधकाम करावयाचे होते. याला प्रशासकीय मंजूरी मिळाल्यानंतरही कामे करण्यात दिरंगाई होते आहे. तर तत्कालीन शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे यांनी काही शाळांना इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग मागणीचे प्रस्ताव मागितले. मात्र, त्यानंतर मंजूरी देण्यात आली नाही. यासोबतच हँडवॉश स्टेशनसाठीही शिक्षण विभागाने उल्लेखनीय कामगिरी केलेली नसल्याचे दिसून येत आहे. अनेक नियमबाह्य कामे करण्यासाठी या विभागात काही दलालांचाही सुळसुळाट असल्याचे नियमित दिसून येत आहे. येथील एका विभागाच्या लिपीकाने तर वरिष्ठांच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात अनियमित कामे केल्याचेही आता शिक्षण वभागाच्या वर्तुळात बोलले जात आहे. मागील वर्षभरात शिक्षण विभागाने केलेल्या कामांची चौकशी करण्याची आता गरज आहे. (शहर प्रतिनिधी)माझ्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी आली, तेव्हापासून मी प्रत्येक गोष्टींवर आवर घालण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वी शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात अनियमितता व नियमबाह्य कामे झाली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमणार आहे.-राजेश डोंगरेउपाध्यक्ष, जिल्हा परिषद, भंडारा.
शिक्षण विभागात अनियमितता
By admin | Updated: August 7, 2016 00:21 IST