शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

विद्युतचा अनियमित पुरवठा; कृषी पंप जळाले

By admin | Updated: May 6, 2015 00:39 IST

सिहोरा परिसरात विजेचा अल्प तथा अधिक दाबाचा पुरवठा सुरु झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंप

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात विजेचा अल्प तथा अधिक दाबाचा पुरवठा सुरु झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंप जळण्यास सुरुवात झाली असून उन्हाळी धानाचे पीक अडचणीत आले आहे.वैनगंगा बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात यंदा उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी अभावी चांदपुर जलाशयाचे पाणी वाटप करण्यात आले नाही. यामुळे २ हजार हेक्टर आर शेतीत धानाची लागवड झाली नाही. मात्र कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली आहे. या शिवाय वैनगंगा नदी पात्रात पाणीच पाणी असल्याने नदी काठालगत शेतकऱ्यांनी कृषी पंपाने पाण्याचा उपसा करण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात थ्री फेज व सिंगल फेज असा विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. २४ तास घरगुती शेतकऱ्यांना थ्री फेज विज पुरवठा ८ तास करण्यात येत आहे. रात्री १२ वाजेच्या सुमारास थ्री फेज विज पुरवठा सुरु होत आहे. या विज पुरवठ्यात अल्प तथा अधिक वाढता दाब असल्याने शेतकऱ्यांचे कृषी पंप जळत आहेत. गेल्या आठवड्यात कृषी पंप जळाल्याचा आकडा ३० च्या घरात गेला आहे. एकच कृषी पंप दोनदा जळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी पंप दुरुस्तीचा भुर्दंड या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे उन्हाळी धानपिक अडचणीत आलेला आहेत.कृषी पंप दुरुस्ती करिता दुकानात शेतकऱ्यांची गर्दी सुरु झाली आहे. थ्री फेज विज पुरवठा मध्यरात्री सुरु करण्यात येत असल्याने शेतकऱ्यात शेतात ये-जा करण्यास भिति निर्माण होत आहे. जग झोपला असतांना देशांचा पोशिंदा शेतकरी मात्र रात्र जागुन काढत आहे. हा चिंतेचा विषय आहे. या परिसरात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली असून शेत शिवारात रानडुकराचे वास्तव्य शेतकऱ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. परिसरात तुर्तास सिंगल फेज योजनेला ब्रेक देवून २४ तास थ्री फेज विज पुरवठा ुसुरु करण्याची ओरड गावात सुरु झाली आहे. (वार्ताहर)सिहोरा परिसरात अल्प तथा अधिक दाबाचा विजेचा पुरवठा होत असून सिंंगल आणि थ्री फेज विज पुरवठयात शेतकरी अडचणीत आला आहे. एक ना धड भाराभर चिंधा अवस्था झाली असून रोज २ कृषी पंप जळत आहेत. -रेखा सोनवाने, सरपंच चुल्हाड.सिंगल आणि थ्री फेज विज पुरवठ्याचा फटका नळ योजनांना बसत आहे. नळ योजनाचे पंप जळत असल्याने गावात पाणी टंचाईचा सामना संभाव्य जनतेला करावा लागत आहे. -नेहा पटले, अध्यक्ष, महिला मंडळ चुल्हाड.सिंगल फेज विज पुरवठयामुळे कुलर, पंखे शोभोची वास्तु ठरत आहेत. अनेक गावात विज दाबाची समस्या असून थ्री फेज विज पुरवठ्याची गरज आहे. -अंजली पारधी, गृहणी वारपिंडकेपार.