शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पर्यटनात ओबीसींचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:35 IST

महाराष्ट्र शासन कृषी पर्यटन धोरणाचा मसुदा अवलोकनासाठी पर्यटन तज्ज्ञांकडे देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकृषीमंत्र्यांशी चर्चा : शिशुपाल पटले यांची मागणी

आॅनलाईन लोकमतभंडारा : महाराष्ट्र शासन कृषी पर्यटन धोरणाचा मसुदा अवलोकनासाठी पर्यटन तज्ज्ञांकडे देण्यात आला आहे. या मसुद्यात कृषी पर्यटन केंद्र उभारणीसाठी अर्थसहाय्य करण्याकरिता केंद्र व राज्य धोरणानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या दोनच प्रवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. शेती व्यवसायात ओबीसी प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्येचा सहभाग असल्यामुळे यात ओबीसींचाही समावेश करावा, या मागणीचे निवेदन माजी खासदार शिशुपाल पटले यांनी कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांना दिले.मुंबई येथील कृषी मंत्रालयात कृषीमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून पटले यांनी या विषयावर प्रदिर्घ चर्चा केली. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. स्थानिक कला, संस्कृतीचे जतन व्हावे, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा. कृषी पर्यटनाच्या माध्यामातून नवीन शेती पूरक व्यवसायाची निर्मिती व्हावी. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण व्हावे. ग्रामीण भागात रोजगार संधी उपलब्ध होवून रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतरण थांबावे, कृषी पर्यटनामुळे ग्रामीण भागातील शेळी-मेंढी पालन, मत्स्य पालन, रेशीम उद्योग, कृषी प्रक्रीया आदी उद्योगांमध्ये वाढ व्हावी. या हेतूने महाराष्ट्र सरकारने नवे कृषी पर्यटन धोरण तयार करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. या धोरणाचा मसुदा पर्यटन तज्ञांसमोर अवलोकनार्थ ठेवला असता कृषी पर्यटन केंद्र उभारणीत अर्थसहाय्य देण्यासाठी अनुसुचित जाती/जमाती सोबतच ओबीसीचा समावेश करावा, अशी सुधारणा शिशुपाल पटले यांनी सुचविली आहे.माजी खासदार शिशुपाल पटले यांनी ही बाब कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या निदर्शनास आणून दिली. ग्रामीण भागातील विशेषत: भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या दुरावस्थे विषयी शिशुपाल पटले यांनी चर्चा केली.कृषी पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी कुटूंबातील बेरोजगारांना कसे रोजगार उपलब्ध होतील, यावरही चर्चा झाल्याचे व कृषी पर्यटन धोरण मसुद्यात ओबीसींचा समावेश करण्याविषयी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची कबूली कृषीमंत्र्यांनी दिल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी सांगितले.