शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जिल्ह्यातील धान व्यापाऱ्यांची सीआयडीमार्फत चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातील बहुतांश धान व्यापारी शेतकऱ्यांकडून दरवर्षी धानाची खरेदी करतात. धानावरील बोनसचा फायदा घेण्यासाठी हे व्यापारी शेतकऱ्यांकडून सात बारा मागवून त्यांच्या नावाने केंद्रात धान जमा करतात. शेतकऱ्यांच्या नावाखाली धान्य व्यापारी गब्बर झाले असून शेतकरी मात्र रसातळाला जात असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सामाजिक न्याय संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान खरेदी केंद्राची किचकट प्रक्रिया पाहता बहुतांश व्यापारी शेतकºयांकडून पडक्या दरात धान खरेदी करतात. त्यानंतर व्यापारी हे धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करतात. यासाठी शेतकऱ्यांच्या सात बाराचा वापर केला जातो. असा प्रकार जिल्हाभर दिसून येत असल्याने धान्य व्यापाऱ्यांची सीआयडी चौकशी केल्यास मोठा गैरव्यवहार उजेडात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता धान व्यापाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक न्याय संघटनेने जिल्हाधिकाºयांमार्फत सीआयडीचे पोलीस संचालक यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा जिल्ह्यातील बहुतांश धान व्यापारी शेतकऱ्यांकडून दरवर्षी धानाची खरेदी करतात. धानावरील बोनसचा फायदा घेण्यासाठी हे व्यापारी शेतकऱ्यांकडून सात बारा मागवून त्यांच्या नावाने केंद्रात धान जमा करतात. शेतकऱ्यांच्या नावाखाली धान्य व्यापारी गब्बर झाले असून शेतकरी मात्र रसातळाला जात असल्याचे वास्तव आहे. व्यापाऱ्यांनी कोणत्या शेतकऱ्यांचा सात बारा मागितला आहे, कोणत्या बँकेत धानाचा बोनस जमा झाला आहे, सर्व सातबारा देणाऱ्या शेतकऱ्यांची यादी व त्यांच्याकडे असलेली जमीन व उत्पादनाची सहनिशा करण्यात यावी, सर्व शेतकऱ्यांची यादी तसेच त्यांच्या नावावर बँकेत जमा होणारा बोनस, धान व्यापाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून शेतकºयांची लूट थांबविण्याची मागणी सामाजिक न्याय संघटनेच्या पदाधिकाºयांनी निवेदनातून केली आहे.शेतकऱ्यांशी साधला संवादव्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली लुबाडणूक बघता सामाजिक न्याय संघटनेने शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला आहे. जिल्हाभरात केलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीत अनेकांनी खाजगी व्यापाऱ्यांना धान विकल्याचे सांगण्यात आले. अनेकांना बोनस मिळाले नसतानाही त्यांच्या सातबाऱ्यावर बोनसची उचल केल्याचे निदर्शनात आले आहे. अशा बोगस धान व्यापाऱ्यांची यादी लवकरच शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय संघटनेचे जिल्हाध्यक्ष अचल मेश्राम यांनी सांगितले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड