शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

साहित्य, कला निर्मितीतून सृजनशीलतेचा अविष्कार

By admin | Updated: January 17, 2016 00:25 IST

अध्यापनात परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने नवीन काही आले की, अध्यापकांचा प्रथमत: नकारात्मक प्रतिसाद दिसतो.

मोहाडी बीट ठरले रोल मॉडल : ज्ञानरचनावाद अध्यापनाला प्रारंभराजू बांते मोहाडीअध्यापनात परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने नवीन काही आले की, अध्यापकांचा प्रथमत: नकारात्मक प्रतिसाद दिसतो. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी शिक्षकांना तयार केले. ‘कुमठे बीट’वरून परतल्यानंतर मोहाडी बीटमध्ये साहित्य निर्मिती करण्याचा अविष्कार घडवून आणला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने तब्बल सहा महिन्यानंतर प्रत्यक्षात व्हायला लागली आहे. कुमठे बीटची प्रेरणा घेऊन ज्ञान रचनावादावर अध्यापन कार्याची सुरुवात मोहाडी तालुक्यात झाली आहे. मोहाडी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी बीटमधील १६९ अध्यापकांना हाताशी धरुन अध्ययन साहित्य निर्मितीची कार्यशाळा मोहगावदेवी, मोहाडी, शिवनी येथे घेतली. त्यात इयत्ता पहिली ते पाचवी वर्गासाठी जिल्हा परिषदेच्या २९ शाळांमध्ये २,९०० अध्ययन साहित्याची निर्मिती शिक्षकांनी केली आहे. यात शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा कलागुण अन् सृजनशिलतेचा अविष्कार होता. वाचन, लेखन, संख्याज्ञान, संख्यावर क्रिया या क्षमतांची संपादणूक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही याचा संकल्प मोहाडी तालुक्याने केला आहे. विद्यार्थ्यांचा अध्यापनात मन रममाण होण्यासाठी मोहाडी बीटमधील २९ जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये वर्गात अध्ययन प्रक्रियेसाठी विविध रंगाचा संच चढविण्यात आला आहे. त्याद्वारे आता प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मोहाडी तालुक्यात आठ केंद्रासाठी मोहाडी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड, जांब बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर गभणे, करडी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप गणवीर, वरठी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी विभावरी पडोळे अशा चार बीटची निर्मिती करुन शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.मोहाडी बीटमध्ये शिक्षकांचा संघ तयार करण्यात आला आहे. मोहाडी बीट तालुक्यासाठी रोल मॉडल तयार झाला आहे. मोहाडी बीटमधील राहिलेल्या उणिवा जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. या बीटमध्ये सजलेल्या शाळा व अध्ययन साहित्याची निर्मिती बघण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांना भेट देता यावी याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाला अंमल करण्याचे नवचैतन्य व स्फूरण कुमठे बीटाने दिले आहे. कुमठे बीटाच्या दौऱ्यानंतर शिक्षकांची चिंतन व प्रेरणा सभा घेऊन तालुक्यासाठी रोल मॉडल बनविले आहे. ज्ञानरचना वादावर साहित्य निर्मिती करण्यासाठी केंद्रप्रमुख तेजस्विनी देशमुख, केंद्रप्रमुख यांचा सक्रिय सहभागाने साहित्य निर्मितीची कार्यशाळा यशस्वी झाली.