शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मोबाईलवर इंटरनेट, कॅफेवर संक्र ांत

By admin | Updated: January 3, 2015 22:57 IST

मागील अनेक वर्षांपासून इंटरनेट सुविधा केवळ सायबर कॅफेमध्येच होती. ग्रामीण भागात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट असणारे मोबाईल हे महागडे असायचे. त्यामुळे सायबर कॅफेत तरुणांची गर्दी असायची.

भंडारा : मागील अनेक वर्षांपासून इंटरनेट सुविधा केवळ सायबर कॅफेमध्येच होती. ग्रामीण भागात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट असणारे मोबाईल हे महागडे असायचे. त्यामुळे सायबर कॅफेत तरुणांची गर्दी असायची. परंतु मागील दोन वर्षांपासून तरुणांच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमुळे सायबर कॅफेवर संक्र ांत आली आहे. सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. मोबाईलक्रांतीने भारले गेले आहे. आजचे तंत्रज्ञान उद्या जुने होत आहे. टॅबबरोबर बाजारात दररोज येणारे नवीन तंत्रज्ञान सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत मिळत आहे. विकसीत तंत्रज्ञानाच्या वस्तू वापरण्याची वृत्ती, सहज व वेगाने उपलब्ध होणाऱ्या इंटरनेटमुळे जग वेगवान झाले आहे. जगभरात कोणतीही गोष्ट घडली की, काही क्षणातच ती आपल्यापर्यंत पोहोचते. गॅस सिलिंडरचा नंबर लावण्यापासून बिल भरणे, स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरणे, सोशलमीडिया वापरण्यापर्यंत सर्वच कामे हातातील मोबाईलच्या माध्यमातून होत आहेत. साधारणपणे १० ते १२ वर्षांपूर्वी सायबर कॅफे या प्रकाराला सुरुवात झाली. इंटरनेटवरून कुठलिही माहिती घ्यावयाची असल्यास इंटरनेट कॅफेतच जावे लागत होते. तेही शहरातच असल्याने ग्रामीण भागातील युवकांची तारांबळ उडायची. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटची भुरळ पडल्याने इंटरनेट कॅफेतच युवकांचा ठिय्या असायचा. सोबतच इंटरनेटवरील गेमही खेळण्याची ‘क्रेझ’ वाढली. त्यामुळे इंटरनेट कॅफे मालकांचा व्यवसाय तेजीत होता. परंतु मागील दोन वर्षात स्मार्टफोन अत्यल्प किंमतीत मिळायला लागल्यामुळे आणि त्यामध्ये इंटरनेट सहज वापरता येत असल्यामुळे तरुणांच्या खिशात इंटरनेट सामावले गेले. यामुळे कॅफेकडे जाणारी पावलांची आता मोबाईलच्या स्क्रीनवर बोटे फिरू लागली आहेत. त्यातच व्हॉट्सअ‍ॅॅप, हाईक, वुईचॅट यासारखी मोबाईलवरची संवाद साधने आल्यामुळे स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. परिणामी इंटरनेट कॅफेची संख्या दिवसागणिक कमी होत चालली आहे. केवळ शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी ग्रामीण भागात कॅफेचा उपयोग होत असून यामुळे कॅफेचा व्यवसाय धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी )