शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारे अ.वा. बुद्धे गुरूजी

By admin | Updated: July 9, 2017 00:28 IST

विद्यार्थी व शिक्षकांचे नाते केवळ पुस्तकापर्यंत मर्यादित नाही. एक साधा शिक्षक मनात ठरवून कामाला झपाटले तर क्रीडा प्रशिक्षकाला जे सहज साध्य होत नाही ते अत्यंत कठीण काम करू शकतो,...

गुरुपौर्णिमा विशेष : क्रीडा प्रबोधीनीत पाठविले ७० विद्यार्थी, शुल्क न घेता करतात मार्गदर्शनराजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विद्यार्थी व शिक्षकांचे नाते केवळ पुस्तकापर्यंत मर्यादित नाही. एक साधा शिक्षक मनात ठरवून कामाला झपाटले तर क्रीडा प्रशिक्षकाला जे सहज साध्य होत नाही ते अत्यंत कठीण काम करू शकतो, असे हिमालयाच्या उंचीचे काम करू शकतो. जिल्हा परिषद शाळेमधील एका साध्या शिक्षकांचा भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण मुलामुलींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यात सिंहाचा वाटा आहे. अ.वा. बुद्धे असे त्या शिक्षकाचे नाव आहे.तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील ढोरवाडा येथील रहिवासी व सध्या मुंढरी येथे जि.प. प्राथमिक शाळेत नव्याने रूजू झालेले अ.वा. बुद्धे यांनी क्रीडा विभागाचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही परंतु खेळाप्रती त्यांची ओढ एखाद्या खेळाडू तथा तज्ञ क्रीडा प्रशिक्षकासारखी आहे. ग्रामीण भागात खेळात मोठी प्रतिभा आहे. परंतू त्यांना संधी उपलब्ध होत नाही अशी खंत अ.वा. बुद्धे यांना आहे. परंतु त्याला दोष न देता बुद्धे यांनी १५ वर्षापुर्वी पहाटे व सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांना देव्हाडी येथील बड्डा क्रीडांगणावर क्रीडा प्रशिक्षण देणे सुरू केले होते. स्व. फत्तु बावनकर यांच्या नावे क्रीडा अ‍ॅकेडमी त्यांनी सुरू केली होती. बेला येथील मयुरी लुटे ही दुसरी खेळाडू दिल्ली येथे क्रीडा प्राधीकरणात क्रीडा कौशल्य विकसीत करीत असून आशीयन क्रीडा स्पर्धेकरिता तिची निवड होण्याची शक्यता आहे. ज्यु. भारतीय हॉकी स्पर्धेतही भंडारा जिल्ह्यातल मुली संध्या खेळत आहेत. आजही अ.वा. बुद्धे विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेकरिता प्रोत्साहन देत असून क्रीडांगण हेच माझे विश्व आहे, असे मोठ्या अभिमानाने सांगतात. शासनाची कोणतीही मदतीविना व क्रीडा प्रशिक्षणाचे प्रशिक्षण न घेणारे अ.वा. बुद्धे खऱ्या अर्थाने हाडाचे शिक्षक आहेत. राज्य शासनाने अशा होतकरू शिक्षकाचा शासनाच्या क्रीडा समितीवर नियुक्ती करण्याची गरज आहे. येथे शासनाला त्यांचा विसर पडल्याचे दिसून येते. भंडारा जिल्हा परिषदेची मान उंचावणाऱ्या शिक्षणाला गुरू पोर्णिमेनिमित्त सलाम.