शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेमुळे आता २४ तास वीज

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करणे, वीजहानी व वाणिज्यिक हानी कमी करणे आणि शहरी भागाबरोबरच ग्रामीण ...

वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण : केंद्राकडून राज्यासाठी २,४०५ कोटींची योजनादेवानंद नंदेश्वर भंडारावीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करणे, वीजहानी व वाणिज्यिक हानी कमी करणे आणि शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील कामे ही संबंधित मंडळ कार्यालयातील लोकप्रतिनिधींसमवेत करून घेतली जाणार आहेत.ग्राहकांपर्यंत वीज नेण्याच्या सर्वच क्षेत्रात अत्याधुनिकता असणे आता काळाची गरज झाली आहे. सिंगल फेजिंग, गावठाण फिडर्स, पुनर्रवित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम व पायाभूत आराखडा प्रकल्प अशा विविध योजनांच्या माध्यमातून महावितरणने आपल्या विद्युत यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण केले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून वीज वितरण यंत्रणेत काही आमूलाग्र बदलही घडले आहेत. या सुधारणांमध्ये आणखी गतिमानता आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना मंजूर केली आहे. या योजनेमध्ये महावितरणच्या ४४ मंडळ कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये या योजनेची कामे होणार आहेत. यामध्ये ३३ बाय ११ केव्ही ची १२८ नवीन उपकेंद्रे बांधण्यात येणार असून ६० उपकेंद्राची क्षमता वाढ केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ३७७८.७२ किमीच्या उच्चदाब, तर ३१५१.८८ किमीच्या लघुदाब वाहिन्या उभारण्यात येणार आहेत. याशिवाय या सर्व भागात सुमारे ६ हजार वितरण रोहित्रे उभारले जाणार आहेत. ही कामे तातडीने आणि दर्जेदार होण्यासाठी संबंधित मंडळ कार्यालयातील लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा करून केली जाणार आहेत. त्यांच्याकडून तसे प्रमाणपत्र घेऊन ही कामे पूर्णत्वास आणावयाची आहेत. त्यामुळे निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास महावितरणला आहे.